Home बुलढाणा लग्नात विनापरवानगी डीजे वाजवाल तर होणार कारवाई ; तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र...

लग्नात विनापरवानगी डीजे वाजवाल तर होणार कारवाई ; तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार यांचे आव्हान!

123
0

आशाताई बच्छाव

1000322947.jpg

लग्नात विनापरवानगी डीजे वाजवाल तर होणार कारवाई ; तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार यांचे आव्हान!

युवा मराठा न्यूज नेटवर्क/ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा :
सध्या लग्नसराईची धामधुम सुरु असुन लग्न व वरात मिरवणुकीदरम्यान सर्रासपणे विनापरवाना डि.जे. वाजविल्या जात आहेत. तसेच लग्न व वरात मिरवणुक काढत असतांना संवेदनशिल ठिकाणी विनाकारण थांबुन मोठया आवाजात डि.जे. या वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात आहेत. त्यामुळे दोन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. पोलीस स्टेशन तामगांव हददीतील ग्राम पातुर्डा येथे सुध्दा दि. २० एप्रिल२०२४ रोजी लग्न मिरवणुकीदरम्यान मस्जीदीसमोर डि.जे. वर आक्षेपार्ह गाणे वाजविण्याचे कारणावरुन दोन गटांमध्ये वाद होवुन दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच काल दि. २७ एप्रिल२०२४ रोजी रात्रीदरम्यान पोलीस स्टेशन सोनाळा हददीतील ग्राम टुनकी येथे झालेल्या वरात मिरवणुकीदरम्यान संवेदनशिल ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजविल्याने दोन गटात वाद होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. डि.जे. या वादयाच्या आवाजामुळे नवजात शिशु तसेच वयोवृध्द लोकांचे कानावर व हदयावर वाईट परिणाम पडत आहेत. पोलीस स्टेशन तामगांव हददीतील गावामध्ये ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहेत, त्याठिकाणी लग्न व वरात मिरवणुक काढल्या जात आहेत किंवा कसे? तसेच मिरवणुकीमध्ये डि.जे. वर वाद्य वाजवणाऱ्यांवर कार्यवाही करिता तामगांव पोलीसांनी आपली गोपनीय यंत्रणा सक्रिय करुन त्यावर लक्ष ठेवुन आहेत. यापुढे पोलीस स्टेशन तामगांव हददीतील कुठल्याही गावामध्ये लग्न, वरात व इतर मिरवणुकीदरम्यान डि.जे. हे वाद्य पोलीसांची पुर्वपरवानगी न घेता डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवुन दोन धर्मामध्ये वाद होवुन कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास डि.जे. वाद्य पोलीस स्टेशनला आणुन त्याचेवर कायदेशीर व दंडात्मक अशी कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच लग्न व वरात मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाबाबत एकमेकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आवाहन तामगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र पवार यांनी जनतेला केले आहे.

Previous articleटुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल
Next articleसहकारनेते गणेशराव देशमुख यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here