Home बुलढाणा जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी दहा हजारांच्या लाच प्रकरणी अटकेत

जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी दहा हजारांच्या लाच प्रकरणी अटकेत

136

आशाताई बच्छाव

1000350540.jpg

युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर                                               जामोद येथील एका व्यक्तीने सालई गोंद अवैधरीत्या जमा केला होता त्यामुळे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण हा गुन्हा सिद्ध न व्हावा म्हणून त्या व्यक्तीतून दहा हजाराची लाचेची मागणी करण्यात आली होती सविस्तर वृत्त अशे की वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ मे रोजी सापळा रचून वनपाल शेख कलीम शेख बिबन (वय ४८) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्यावर जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाच्या अखत्यारितील सालई गोंद अवैधरीत्या जमा केल्याने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल होता. त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध न व्हावा, यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने दहा हजारांची मागणी केली होती याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यांची माहिती मिळाली
त्यांनतर ६ मे रोजी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी वनपाल शेख कलीम याला दहा हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय बुलढाणा येथील पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे, निरीक्षक सचिन इंगळे, सहायक फौजदार श्याम भांगे, हवालदार प्रवीण बैरागी, हवालदार विनोद लोखंडे, जगदीश पवार, रणजित व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे, हर्षद शेख यांनी केली आहे .”

Previous articleरक्षकच बनले भक्षक जळगाव येथील गाई व बैल चोरी मधील आरोपींना पोलीस घालताहेत पाठीशी ? तपास अधिकारी बदलण्याची शेतकऱ्याची मागणी
Next articleविदर्भातील पारंपरिक परंपरा भेंडवळ पाऊसाचा नेमका अंदाजाची प्रथा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.