Home बुलढाणा सहकारनेते गणेशराव देशमुख यांचे निधन

सहकारनेते गणेशराव देशमुख यांचे निधन

24
0

आशाताई बच्छाव

1000323011.jpg

सहकारनेते गणेशराव देशमुख यांचे निधन

युवा मराठा न्यूज नेटवर्क बुलढाणा/
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याअंतर्गत येणार्‍या उमरा देशमुख येथील भूविकास बँक, जिल्हा बँक, अर्बन बँकचे माजी संचालक व सहकारनेते गणेशराव दौलतराव देशमुख यांचे आज रविवारी दुपारच्या सुमारास निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 82 वर्षे होते. विशेष म्हणजे गत महिन्यात त्यांच्या पत्नी मालतीताई यांचे निधन झाले होते. रविवारी सांयकाळच्या सुमारास त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,दोन भाऊ, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. ते युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील बापू देशमुख यांचे आजोबा होते.देशमुख कुटुंबियांवर कोसळलेल्या आकस्मिक दुःखात युवा मराठा न्यूजपेपर्स, युवा मराठा न्यूज चॅनल, युवा मराठा महासंघ, आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र परिवार सहभागी आहे.मुख्य संपादक 

Previous articleलग्नात विनापरवानगी डीजे वाजवाल तर होणार कारवाई ; तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार यांचे आव्हान!
Next articleलासलगाव येथे संगीतमय तुलसी रामायण कथा प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here