Home विदर्भ लग्न करुन देत नाही म्हणून विदर्भात मुलाकडून बापाचा खुन

लग्न करुन देत नाही म्हणून विदर्भात मुलाकडून बापाचा खुन

171
0

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र कलकोट – वाशीम तालुका प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज
वाशिम : लग्न लावून का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून मुलानेच जन्मदात्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची संतापजनक व धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे ५ नोव्हेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली.
याप्रकरणी आरोपी मुलास अटक केली. धर्मा भारती, असे मृताचे नाव असून प्रमोद भारती असे आरोपीचे नाव आहे.

जऊळका रेल्वे येथील संजीवनी महादेव भारती यांनी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा दीर प्रमोद भारती (३०) हा लग्न का लावून देत नाही या कारणावरून वडील धर्मा भारती यांना वारंवार शिवीगाळ करीत होता. लग्न का करून देत नाही, मला मुंजाच ठेवता का? अशा क्षुल्लक कारणावरून ५ नोव्हेंबर रोजी प्रमोदने शिवीगाळ करीत वडिलाशी वाद घातला. तुला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे तर कर; परंतु, शिवीगाळ करू नको, असे वडिलांनी म्हणताच प्रमोदने लोखंडी कुऱ्हाडीने वडिलाच्या डोक्यावर तसेच दोन्ही पायावर वार केले. याचवेळी प्रमोदने फिर्यादी तसेच भावालादेखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमीला अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०२, ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे करीत आहेत.

आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणात मुलगा हाच आरोपी असल्याने निष्पन्न झाल्याने पोलिसांनी प्रमोद भारती याला ताब्यात घेतले.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा, संपाबाबत मनसेने घेतला मोठा निर्णय
Next articleडोक्याला काळ्या पट्टय्या बाधुन राज्य सरकारचा निषेध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here