Home नांदेड देगलूर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ. महिलेचा खून करून सुमारे चार लाखाचा ऐवज लुटला

देगलूर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ. महिलेचा खून करून सुमारे चार लाखाचा ऐवज लुटला

122
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0041.jpg

देगलूर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ. महिलेचा खून करून सुमारे चार लाखाचा ऐवज लुटला

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर: शहरातील अंत्यत वर्दळीचा भाग असलेल्या लालबहादूर शास्त्री नगरात दरोडेखोरांनी एका दाम्पत्याच्या घरात धुमाकुळ घातला. वृद्ध महिलेने दागिणे देण्यास विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली या दरोड्यात जवळपास चार लाखाचा ऐवज लुटून नेण्यात आला ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांबद्दल रोष व्यक्त होत आहे.याबाबत माहिती अशी की, देगलूर-उदगीर या मुख्य रस्त्यालगत असलेले लालबहादूर शास्त्री नगर अंत्यत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या नगरात तरंग बार जवळ येडूर ता. देगलूर येथील मुळ रहिवाशी असलेले पाटील दाम्पत्य राहते. सोमवारी रात्री जेवणानंतर वृद्ध पती, पत्नी झोपले होते. रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने घरात प्रवेश केला. ऐवज लुटीसाठी
घरमालक श्रीपतराव रामजी पाटील वय वर्षे ९० वर्षे व त्यांच्या पत्नी चंद्रकला भीमराव पाटील यांचे हात पाय बांधले. चाकूचा धाक दाखवून चंद्रकलाबाई यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करीत असताना विरोध करताच चंद्रकलाबाई यांची हत्या केली. यानंतर गळ्यातील मनी मंगळसूत्र, सोन्याचे बोरमाळ हातातील सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे कडे व चांदीचे ७० तोळ्याचे वाळे असे एकूण तीन लाख ८९ हजार रुपयाचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. देगलूर – उदगीर या मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या बाजूला आणि रात्रंदिवस वाहने व लोकांची वर्दळ असलेल्या परिसरात दरोडा पडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. तर देगलूर शहरात वारंवार चोरी, दरोडा, खून असे गुन्हे वाढत आहेत.
या प्रकरणी श्रीपतराव रामजी पाटील यांच्या फिर्यादीनूसार देगलूर पोलीस ठाण्यात कलम ३९७,३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.

Previous articleदेवळा – सटाणा महामार्गावर कांदा चाळ तोडुन कंटेनेर थेट शेतात
Next articleअसंविधानिक मार्ग अवलंबिल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई – जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here