Home मुंबई दसरा मेळाव्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे गट रस्सीखेच!

दसरा मेळाव्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे गट रस्सीखेच!

135

आशाताई बच्छाव

IMG-20220906-WA0012.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: दसरा मेळाव्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे गट रस्सीखेच! यावर्षी दसरा मेळाव्यासाठी रंगत पाहायला मिळणार हे नक्की. दसरा मेळाव्यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी बीएमसीला अर्ज केला होता‌. त्यानुसार त्यांना अजूनही परवानगी मिळाली नाही .बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की गणपती मेळावा संपल्यानंतर यावरती निर्णय होईल .त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गट यांनी देखील दसरा मेळावा घडवून आणण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे गटांनी सुद्धा दसरा मेळाव्यासाठी प्लॅन बी तयार केलेला आहे. एकंदरीतच शिवाजी पार्क हे मैदान कोणाला मिळणार यावरती लक्ष केंद्रित होत आहे .मुंबई बीएमसी ने सांगितले की ज्यांनी पहिल्यांदा अर्ज केला त्यांना शिवाजी पार्क मैदान मिळणार. याचाच अर्थ शिवाजी पार्क हे मैदान शिवसेना ठाकरे यांना मिळणार हे नक्की. त्यानंतर बीएमसी ने हे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटांनी एम एम आर डी बीकेसी मैदानावरती दसरा मेळावा घेणार असे सांगितले. त्यासाठी शिंदे गटांनी बीकेसी मैदानासाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गट शिवसेने मधून बाहेर पडलेल्या नेत्यांना आमंत्रण देणार असं सूत्राने सांगितले जात आहे .परंतु याचा आमंत्रण स्वीकार होईल की नाही ते येणारा काळच सांगेल. एकंदरीत काय तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते हे नक्की.

Previous articleलम्पि स्किन डिसीज’प्रादुर्भाव; पशुसंवर्धन आयुक्त संचिन्द्र प्रताप सिंह यांनी घेतला आढावा: अकोट तालुक्यात दिली भेट
Next articleऑनलाइन गेम्स ‘ चा आयकर विभागाच्या रडारवर!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.