Home Breaking News ऑनलाइन गेम्स ‘ चा आयकर विभागाच्या रडारवर!

ऑनलाइन गेम्स ‘ चा आयकर विभागाच्या रडारवर!

139

आशाताई बच्छाव

IMG-20220906-WA0009.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: ‘ऑनलाइन गेम्स ‘ चा आयकर विभागाच्या रडारवर! आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेम्स खेळ सुरू करण्यात आलेला आहे. विविध प्रकारच्या गेम्स खेळल्या जात आहेत. ऑनलाईन मोबाईल वरती त्या गेमच्या माध्यमातून अनेक लोकांनी करोडो रुपयांचा व्यवसाय सुरू केला आहे. काही लोकांनी करोडो रुपये कमवले आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या खात्याने ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांची यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार ३ वर्षात ५८ हजार कोटींची कमाई झालेली आहे असे दिसते .त्यामुळे या केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने, आयकर विभागाने या सर्व ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्यांना नोटीसा पाठवायला सुरुवात केली आहे. त्यांना सूचित करण्यात आले आहे की तुम्ही कमावलेल्या पैशांमध्ये कर भरा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. पैसे कमावणाऱ्यांना कर भरावेच लागतो. त्यामुळे तो तुम्हाला भरावाच लागणार आहे, तो जर वेळेत भरला तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. जर नाही भरला तर तुमच्यावरती कारवाई शंभर टक्के होणार असे आयकर विभागाने सांगितलेले आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ऑनलाईन गेम्स खेळताना कर भरावे लागणार हे नक्की.

Previous articleदसरा मेळाव्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे गट रस्सीखेच!
Next articleतामगाव पोलीस स्टेशन कडून अन्याय होत असल्याची तक्रार! पोलीस अधीक्षक बुलढाणा कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.