Home बुलढाणा तामगाव पोलीस स्टेशन कडून अन्याय होत असल्याची तक्रार! पोलीस अधीक्षक बुलढाणा कार्यालयासमोर...

तामगाव पोलीस स्टेशन कडून अन्याय होत असल्याची तक्रार! पोलीस अधीक्षक बुलढाणा कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..

104
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0039.jpg

तामगाव पोलीस स्टेशन कडून अन्याय होत असल्याची तक्रार! पोलीस अधीक्षक बुलढाणा कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद येथील तक्रारदार यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की गेल्या 70 वर्षापासून राधा रमण संस्थान माळेगाव बाजार तालुका तेल्हारा यांच्या मालकीची कोलद शिवारातील गट नंबर 33, ४४, ९६ व १०० ची शेती संस्थांच्या संमतीने तक्रारदार हे वहिती करीत आहेत.
परंतु गैरहर्जदार यांचे कडून सातंत्याने गुंडागर्दी करत सदर शेतावरील वहितीत तक्रारदार यांनाअडथळा निर्माण करीत आहेत त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिवाणी न्यायालय जळगाव जामोद येथे रे.दि.मु.नं.७९/२००४ ला दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल दिनांक २१ ऑगस्ट २००८ रोजी सदर जमिनीवर तक्रारदार यांचा ताबा असल्याचे दिवाणी न्यायालयाने मान्य करीत गैरजदार यांना शेतात येण्यासंबंधी कायम मनाई केलेली आहे. तसेच संग्रामपुर तहसील कोर्टानेही नुकताच आमचा ताबा असल्याचे दिनांक ०१ सप्टेंबर 2022 च्या आदेशान्वये स्पष्ट म्हटले आहे.सातबारा उताऱ्यामध्ये देखील इतर अधिकार मध्ये तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने नोंदी आलेल्या आहेत. असे असताना देखील गैर अर्जदार हे आमच्याशी गेल्या चार महिन्यापासून दररोज शेतामध्ये येऊन वाद घालने,हाणामारी करणे, कुटुंबातील महिलांना समोर करून खोट्या केसेस मध्ये अडकविण्याच्या धमक्या देत आम्हाला प्रचंड मानसिक त्रास देत आहेत.
वरील सर्व घटनाक्रम पोलीस स्टेशन तामगाव येथे समक्ष जाऊन वारंवार सांगितले असता पाहू त्यांना बोलावतो सांगतो असे उडवडीची उत्तरे देत आमची लेखी अथवा तोंडी तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाहीत. यावरून पोलीस स्टेशन तामगावला हा वाद मिटवायचा नाही तर असाच पेटत ठेवायचा असावा असेच दिसून येत आहे.
त्यामुळे यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घातल्याशिवाय हा वाद मिठूच शकत नाही अशी आमची धारणा झाली आहे. तरी वरिष्ठांनी एखादी जीवितहानी होण्यापूर्वी यामध्ये लक्ष घालून गैर अर्जदार यांच्यावर कठोर कारवाई करून हा विषय कायमस्वरूपी सोडवावा असे तक्रारदार यांनी दिलेल्या उपोषणाच्या निवेदनात म्हटले असून. तक्रारदार यांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी १ वाजेपासून पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांचे कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार उपोषणा दरम्यान कोणाच्याही जीवित्वाची हानी झाल्यास ठाणेदार पोलीस स्टेशन तामगाव यांची सर्वस्वी जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी. असे दिनांक १३ सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या उपोषणाच्या उपोषणाचे निवेदनात म्हटले असुन उपोषण कर्ते अजितसिंग डाबेराव, काशिनाथ वानखेडे, बाळकृष्ण धुंदळे, रणजीत डाबेराव, प्रदीप धुंधळे, महादेव वानखडे,कैलास वानखेडे, प्रकाश वानखेडे, दुर्गा बाळासाहेब अवचार, योगिता विजय अवचार,आशा गोपाळराव अवचार सर्व राहणार कोलद यांनी गैरहर्जदार विरुद्ध तामगाव पोलीस स्टेशन कार्यवाही करत नसल्यामुळे तामगाव पोलीस स्टेशन विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

Previous articleऑनलाइन गेम्स ‘ चा आयकर विभागाच्या रडारवर!
Next articleदेगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवीन कँडेटस् ची भरती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here