Home नांदेड देगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवीन कँडेटस् ची भरती

देगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवीन कँडेटस् ची भरती

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0041.jpg

देगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवीन कँडेटस् ची भरती

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

दिनांक 06/09/2022 : महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना विभागात नवीन कॅडेटस् ची भरती करण्यात आली. सदरील भरतीसाठी 52 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेडचे कमांडिंग ऑफिसर मा. कर्नल रंगराव यांची विशेष उपस्थिती होती. मा. कमांडिंग ऑफिसर कर्नल रंगाराव व प्राचार्य डाँ. मोहन खताळ आणि अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पाटील बेंम्बरेकर संस्थेचे सदस्य श्री.रवींद्र अप्पा द्याडे यांच्यामध्ये विविध विषया संदर्भात चर्चा झाली. तसेच कमांडिंग ऑफिसर कर्नल रंगराव यांनी राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे व महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच काही सकारात्मक बदलांची सूचना देखील केली.

सन 2022-23 च्या भरतीसाठी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांचा उदंड असा प्रतिसाद लाभला.. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डाँ.मोहन खताळ उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार व एन.सी.सी. चे प्रमुख लेफ्ट. डॉ. निरजकुमार उपलंचवार यांच्या हस्ते मा. कमांडिंग ऑफिसर कर्नल रंगराव यांचे सहर्ष स्वागत व सत्कार करण्यात आला.तसेच निवड प्रक्रिया यशस्वी रित्या संपन्न होण्या करीत बटालियन चे सैनिक लाल मोहम्मद व जगत सिंग आणि महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संतोष येरावार,प्रा.हाके सिताराम,श्री. मधुकर कांबळे सर व महाविद्यालयाचे कार्यालयीन आशिक्षक गोविंद जोशी शिक्षकेत्तर कर्मचारी वारीष्ट लिपिक श्री. प्रशांत चौहान,श्री.हेमनर गोविंद,श्री. मारोती सोनकांबळे एन सी सी चे सिनियर धनाजी वाघमारे व गायकवाड अजय यांनी परिश्रम घेतले.

Previous articleतामगाव पोलीस स्टेशन कडून अन्याय होत असल्याची तक्रार! पोलीस अधीक्षक बुलढाणा कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..
Next articleश्री संत किसन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने किर्तन व महाप्रसादाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here