Home नाशिक देवळा – सटाणा महामार्गावर कांदा चाळ तोडुन कंटेनेर थेट शेतात

देवळा – सटाणा महामार्गावर कांदा चाळ तोडुन कंटेनेर थेट शेतात

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0046.jpg

देवळा – सटाणा महामार्गावर कांदा चाळ तोडुन कंटेनेर थेट शेतात

मनोहर देवरे ( प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)

देवळा ते सटाणा या राष्ट्रीय महामार्गावर लोहोणेर येथिल पार्वतानंद लॉन्स जवळील रस्त्यावरील वळणावर झालेल्या अपघातात कंटेनरने कांदा चाळीचे नुकसान केले आहे. सम्पूर्ण कांदा चाळ तोडून कंटेनर रस्त्यालगतच्या शेतात गेल्याने नव्याने लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत देवळा पोलिसांत मोटार अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी (२३) रोजी देवळा सटाणा रस्त्यावर सटाण्याच्या दिशेने जात असलेले कंटेनर रस्त्याच्या कडेला वळणावरील असलेल्या वटवृक्षाच्या पारंब्यामुळे रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळिवर जाऊन धडकल्याने यात संपूर्ण कांदा चाळ नेस्तनाबूत झाली. चाळ तोडून कंटेनर थेट शेतात जाऊन उभे राहिले या गंभीर अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या मार्गावर, अगदी रस्त्याला लागून असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या व पारंब्या मुख्य रस्त्यावर आल्याने दुचाकी, चारचाकी, व अवजड वाहने चालविणे अंत्यत धोकादायक व जिकिरीचे झाले आहे, सोमवारी (२३) रोजी रात्री एक अवजड कंटेनर सदर वटवृक्ष व पारंब्या टाळण्याचा नादात रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळीवर जावुन धडकले, त्यामुळे १०० ते १५० फुट लांबीच्या कांदा चाळीचे नुकसान झाले आहे, येथील प्रगतिशील शेतकरी व पार्वतानंद मंगल कार्यालयाचे मालक दौलत आनंदा बच्छाव यांच्या कांदा चाळीचे व शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने चाळीत नेहमी मुक्कामी असलेले मजुर तेथे नसल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान , या रस्त्यावर आलेल्या वडाच्या झाडाच्या पारंब्या अपघातास कारण कारणीभूत ठरत असून,
सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन व वरिष्ठ अभियंता यांनी या विषयी तातडीने लक्ष घालुन रस्त्यावरील वडाची झाड व पारंब्या त्वरित हटवण्यासाठी तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनोद आहेर यांनी सा.बा. विगाचे अभियंता मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

Previous articleअजमीर सौंदाणे सरपंच अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती
Next articleदेगलूर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ. महिलेचा खून करून सुमारे चार लाखाचा ऐवज लुटला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here