• Home
  • *मंडप डेकोरेशन असोसिएशन च्या वतीने मुख्याधिकारी ,* *नगराध्यक्ष , पोलीस निरीक्षक* *यांना निवेदन*

*मंडप डेकोरेशन असोसिएशन च्या वतीने मुख्याधिकारी ,* *नगराध्यक्ष , पोलीस निरीक्षक* *यांना निवेदन*

*मंडप डेकोरेशन असोसिएशन च्या वतीने मुख्याधिकारी ,* *नगराध्यक्ष , पोलीस निरीक्षक* *यांना निवेदन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

देशासह राज्यातील सर्वच व्यापाऱ्यांना या कोरोना महामारीच्या संकटाने हैराण केले आहे सततचे होणाऱ्या लाँकडाऊन मुळे सर्वच व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर मंडप डेकोरेशन ,लाईट, कँटरर्स यांचे देखील या कोरोनामुळे लग्नसमांरभ , इतर धार्मिक कार्यक्रम न झालेने फार मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते व कामगारांचे पगार भागवणे मुश्कील झाले आहे.
गेल्या सात महिन्यापासुन कोरोना महामारीने पेठ वडगांव व परिसरातील मंडप व्यवसाय बंद स्थितीत आहे ,
त्यामुळे मंडप व्यवसायास नवसंजीवन मिळणेसाठी दुर्गामाता (दसरा) उत्सवाकरीता मंडप व्यावसायिकांना मंडप घालणेकरीता परवानगी मिळणे साठी वडगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा कोल्हे
, नगराध्यक्ष मोहनलाल माळी ,व पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांना निवेदनद्वारे मागणी केली.
यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष श्री.महेश भोपळे , उपाध्यक्ष श्री.विकास कांबळे , खजिनदार श्री.सुरज कदम , सचिव श्री सुनिल पाटील , कार्याध्यक्ष निशिकांत सावर्डेकर , किरण पाटील , अजय शिंदे , तालुका अध्यक्ष फिरोज आत्तार , संतोष धोत्रे , अनिल सावर्डेकर , निलेश शिंदे
इत्यादी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment