*जिल्ह्यात आज अखेर 38 हजार* *522 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
कोल्हापूर जिल्ह्यात आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 801 प्राप्त अहवालापैकी 672 निगेटिव्ह तर 129 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 248 प्राप्त अहवालापैकी 217 निगेटिव्ह तर 31 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 142 प्राप्त अहवालापैकी 107 निगेटिव्ह तर 35 पॉझीटिव्ह असे एकूण 195 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 46 हजार 377 पॉझीटिव्हपैकी 38 हजार 522 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 6 हजार 330 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 195 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड-3, चंदगड-8, गडहिंग्लज-4, हातकणंगले- 15, कागल-2, करवीर-17, पन्हाळा- 5, राधानगरी-1, शाहूवाडी-12, शिरोळ-9, नगरपरिषद क्षेत्र- 22, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 86 व इतर शहरे व राज्य 10 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-811, भुदरगड- 1162, चंदगड- 1102, गडहिंग्लज- 1320, गगनबावडा- 131, हातकणंगले-5061, कागल-1590, करवीर-5368, पन्हाळा- 1781, राधानगरी-1193, शाहूवाडी-1238, शिरोळ- 2385, नगरपरिषद क्षेत्र-7133, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 53 असे एकूण 44 हजार 328 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 49 असे मिळून एकूण 46 हजार 377 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 46 हजार 377 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 38 हजार 522 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 525 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 6 हजार 330 इतकी आहे.