Home Breaking News *अवघ्या ४० रूपयाच्या उधरीसाठी* *युवकाचा खुन*

*अवघ्या ४० रूपयाच्या उधरीसाठी* *युवकाचा खुन*

84
0

*अवघ्या ४० रूपयाच्या उधरीसाठी* *युवकाचा खुन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील करविर तालुक्याच्या वसगडे गावात
निव्वळ चाळीस रुपयाची मागील उधारी देण्याच्या कारणावरून दारु पिताना वाद होवून अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे ( वय २८) याचा गळा दाबून खून केल्याची घटना बुधवार दि ७ रोजी रात्री नऊच्या सुमारास समाज मंदिरात घडली. गांधीनगर पोलिसांनी जगदीश नायकू कांबळे (वय २७ )रा. वसगडे या संशयितास ताब्यात घेतले आहे. या बाबतची फिर्याद उल्हास चुडाप्पा कांबळे यांनी दिली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी वसगडे (ता. करवीर ) येथील समाज मंदिरामध्ये अनिल उर्फ रोहीदास कांबळे व जगदीश कांबळे हे दारूच्या नशेत बोलत बसले होते . दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला त्यातुन मागील चाळीस रुपयांच्या उधारीसाठी शिवीगाळ सुरू झाली . त्यानंतर एकमेकांच्या अंगावर जावुन हाणामारी सुरु झाली . झटापटीत जगदीश कांबळे याने अनिल उर्फ रोहीदास कांबळे याचा जोरात गळा दाबला . त्यानंतर जगदीश हा समाज मंदीरातुन पसार झाला . निपचित पडलेल्या अनिलच्या नातेवाईकांनी तात्काळ गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी त्याला दाखल केले.
पण जागेवरच हालचाल बंद झालेल्या अनिलला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर , उपनिरीक्षक अतुल कदम, मलमे, मोहन गवळी, चेतन भोंगाळे संदीप सावंत, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, सुभाष सुदर्शन आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कृष्णात पिंगळे यांनी संशयित जगदीश कांबळे याला गावातूनच ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर यांनीही भेट दिली. शवविच्छेदन सी.पी.आर. मध्ये केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला . घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Previous article*जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार कशी?येवल्यातही कामाची होतीच ऐसीतैसी..!*
Next article*मंडप डेकोरेशन असोसिएशन च्या वतीने मुख्याधिकारी ,* *नगराध्यक्ष , पोलीस निरीक्षक* *यांना निवेदन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here