Home Breaking News *जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार कशी?येवल्यातही कामाची होतीच ऐसीतैसी..!*

*जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार कशी?येवल्यातही कामाची होतीच ऐसीतैसी..!*

100
0

*जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार कशी?येवल्यातही कामाची होतीच ऐसीतैसी..!*
*ग्रामसेवक घोंगडेचा महाप्रताप*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* काही माणसांना अत्यंत वाईट व घातक सवयी असतात आणि त्यामुळे मग ते आपल्या पद आणि प्रतिष्ठेचाही विचार करीत नाहीत.कारण एकदा लागलेली खोड मेल्याशिवाय काही सुटत नाही.असे,म्हटले जाते ते काही उगीच नाही.सध्या कौळाणे (निं.)ग्रामपंचायतीचा तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे व पदावर नसलेल्या सरपंच ताईंनी संगनमताने केलेल्या महाप्रतापाचा रोजच हा धांडोळा लिहीत असताना,आज येथे मुद्दामच प्रकर्षाने हा विषय लिहावा लागतोय की,पत्रकार भवनसाठी कागदोपत्री ठरावाव्दारे २०१८साली दिलेली जागा घोंगडे नामक ग्रामसेवक सरपंच ताईच्या कुटील कारस्थानाला बळी पडून कशी काय?आणि कोणत्या नियमाखाली असहमतीचे कारण दाखवून नामंजूर करु शकतो?हा अधिकार तरी ग्रामसेवक व सरपंच ताईना आहे का?याचेही आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे,जो अधिकार विभागीय महसूल आयूक्तांचा आहे,तो स्वतः च वापरुन ग्रामसेवक घोंगडे व कौळाणेच्या पदावर नसलेल्या सरपंच ताईनी नेमके काय सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे असाच सवाल सध्या तरी विचारला जातोय.ज्या कौळाणे गावात बेकायदेशीर अतिक्रमण उभी राहिलीत त्यांना साध्या नोटीसा बजावण्याचे धाडस मात्र सरपंच ताई किंवा ग्रामसेवक घोंगडेनी केले नाही.मात्र सामाजिक व विधायक कार्यासाठी असलेल्या पत्रकार भवनच्या जागेवर खोळंबा घालून स्वतःच्या मनमानी कारभाराने दिलेली जागा नामंजूर करण्याचे धाडस सरपंच ताईनी कुणाच्या आशिर्वादाने केले?गावाचा विकास कसा केला जातो..विधायक कामांना खीळ घालून अन अवैध धंद्याना प्रोत्साहन देऊन हा आदर्श कौळाणे ग्रामपंचायतीकडून घेण्यासारखा आहे.ग्रामसेवक घोंगडेचा तर इतिहासच आहे,मुळचे सोनज ता,मालेगांव येथील रहिवाशी असलेले संजीव घोंगडे हे कामात अत्यंत बेफिकीर व उदासीन आहेत.त्यामुळेच येवला तालुक्यातल्या पिंपळगांव जलाल येथे नोकरीत असताना त्यांचेवर निलंबित होण्याची नामुष्की ओढवल्यानंतरही त्यांच्या कामात कुठलीही सुधारणा झालीच नाही,आणि शेवटी कौळाणे (नि.)गावातही त्यांनी आपल्याला असलेल्या खोडचा झटका पत्रकार भवनच्या प्रश्नी सरपंच ताईच्या संगनमताने दिला,खरा मात्र त्याचे दुष्परिणाम आता दुर नाहीत.जोपर्यंत ग्रामसेवक घोंगडेना निलंबित करुन तत्कालीन सरपंचासह घोंगडेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तरी आमचे हे लेखनी युध्द बंद होणार नाही.हेच अंतीम सत्य आहे.

Previous articleहॉटेल, फुट कोर्टस, रेस्टॉरन्टस्, बारमधील कामागारांच्या कोरोना तपासणीसाठी फिरते पथक – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next article*अवघ्या ४० रूपयाच्या उधरीसाठी* *युवकाचा खुन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here