Home विदर्भ एएसपी श्रवण दत्त एस यांची गुन्हेगारांमध्ये दहशत, शेगांव येथे अवैध गुटख्यापाठोपाठ सेक्स...

एएसपी श्रवण दत्त एस यांची गुन्हेगारांमध्ये दहशत, शेगांव येथे अवैध गुटख्यापाठोपाठ सेक्स रॅकेटचा लावला छडा

175
0

राजेंद्र पाटील राऊत

एएसपी श्रवण दत्त एस यांची गुन्हेगारांमध्ये दहशत, शेगांव येथे अवैध गुटख्यापाठोपाठ सेक्स रॅकेटचा लावला छडा.          (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा) गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून छाप सोडणार्‍या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी शेगाव येथील अवैध गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या नंतर शेगाव येथील लॉज मध्ये सुरू असलेल्या अवैध देहव्यापार करणाऱ्या दोन मुलींसह दोन युवकांसोबतच लॉजच्या मॅनेजरला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अवैध देहव्यापार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल केला. या दोन्ही कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस यांची प्रचंड दहशत निर्माण झालेली दिसत आहे. मागील वर्षी शेगाव बाळापुर रोडवर असलेल्या हॉटेल अंबर येथे पोलिसांनी छापा मारून पश्चिम बंगाल राज्यातील उच्चशिक्षित पंचवीस वर्षाच्या तरुणीला अवैध देहव्यापार करतांना काही ग्राहकास समवेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर यावर्षीही गुरवार दिनांक २७ जानेवारी रोजी गढी जवळ असलेल्या हॉटेल आशिर्वाद इथे यवतमाळ आणि जळगाव खान्देश जिल्ह्यातील दोन तरुणी समवेत बाळापूर येथील दोन युवकांना नको त्या स्थितीत अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या पथकाने शेगाव शहर पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या या कारवाईमुळे शेगाव शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वास्तविक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून शेगावकडे पाहिले जाते धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या शहरात पोलीस विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे राज्यामध्ये बंदी असलेला अवैध गुटखा विक्री असो किंवा बाहेर गावावरून येथे तरुण मुली आणून त्यांच्याकडून देहव्यापार व्यवसाय असो खुलेआम पणे सुरू होता. यासोबतच अवैध दारू विक्री वरली मटका जुगार अड्डे सुद्धा पोलिसांच्या आर्थिक दुर्लक्षामुळे सुरूच आहेत. मात्र अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार श्रवण दत्त एस यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी अशा अवैध व्यवसायिकांविरुद्ध सुरू केलेली धडक मोहीम पुढेही अशीच सुरू ठेवावी आणि अवैध देहव्यापार धंद्यामध्ये तरुणींना ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा तसेच त्यांच्या मुसक्या आवळून शेगाव शहराला अशा प्रकारे बदनाम करणाऱ्या धंद्यापासून पूर्णपणे मुक्त करावे अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

Previous articleसुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरून राजकीय भूकंप..?
Next articleफक्त तीन अक्षरांचा शब्द “सबंध”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here