Home रत्नागिरी मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे 8 दिवसात न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार...

मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे 8 दिवसात न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार रास्ता रोको

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0023.jpg

मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे 8 दिवसात न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार रास्ता रोको    रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) 

चिपळूण तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असुन मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम होणे हे जितके गरजेचे आहे त्या पेक्षाही तात्पुरत्या स्वरूपाची पावसाळ्या पुर्वी नागरिकांची सोय देखील करणे गरजेचे होते.उन्हाळ्यामध्ये खड्डे भरले गेले आणि ते पहिल्या पावसाळ्यातच व्हावुन गेले हे योग्य नाही. आज प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे .त्याप्रमाणे काही अपघात ही झाले की त्यामध्ये कुटुंबातील आधार आपल्यातुन निघून गेले त्याला जबाबदार कोण तरी आठ दिवसात खड्डे भरुन न झाल्यास चिपळुण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल अशी परखड भूमिका मांडण्यात आली.

यावेळी माजी आमदार रमेश कदम, जयद्रथ खताते, शौकत मुकादम, किशोर रेडिज, चित्रा चव्हाण, दिशा दाभोलकर, हिंदूराव पवार, मुराद अडरेकर, शांतीलाल ओसवाल, आदिती देशपांडे, रुक्सार अलवी, राजाभाऊ चालके, रफीक मोड़क, सीमाताई चालके, पूनम भोजने, विलास महाडिक,नितीन ओसवाल,खालिद दाभोलकर, अविनाश हरदारे, समीर पवार, कादिर परकार, इम्रान कोंडकरी, छोटू कोलगे, राजू शिंदे, सचिन शिंदे,प्रकाश पवार, प्रसन्ना आंवले, बरकत पाते, कादिर मुकादम, विनायक पाटेकर, मुबीन माटवणकर, खालिद पटाइत त्याच प्रमाने शहरातील बहुसंख्य व्यापारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleकेंद्रीय मंत्री नारायण राणेनी दिली रत्नागिरी कारागृह, लोकमान्य टिळक स्मारकास भेट
Next articleसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला तिरंग्याच्या स्वरूप देण्यात आले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here