Home रत्नागिरी केंद्रीय मंत्री नारायण राणेनी दिली रत्नागिरी कारागृह, लोकमान्य टिळक स्मारकास भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणेनी दिली रत्नागिरी कारागृह, लोकमान्य टिळक स्मारकास भेट

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0025.jpg

केंद्रीय मंत्री नारायण राणेनी दिली रत्नागिरी कारागृह, लोकमान्य टिळक स्मारकास भेट                            रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र लढ्याच्या स्मृती आपल्या मनात सदैव रहाव्यात, स्वातंत्र लढयातील महान व्यक्तीमत्वांचे स्मरण व्हावे यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीला आणि लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यांच्या कार्यासमोर, त्यागासमोर मी नतमस्तक झालो असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

नारायण राणे यांनी प्रथम विशेष कारागृहातील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या छोट्या कोठडीत तुरुंगवास भोगला त्या कोठडीला भेट दिली. तेथील स्वा. सावरकर यांच्या तैलचित्राला अभिवादन केले आणि बंदीवानांशी संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक चांदणे यांनी राणे यांचे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

त्यानंतर नारायण राणे यांनी शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकाला भेट दिली. लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. टिळकांच्या निवासस्थानाला भेट देऊन तेथे जतन केलेल्या आठवणींची माहिती घेतली. यावेळी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांचा सन्मान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला.

यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चिरायू हॉस्पिटलमध्येही शानदार ध्वजारोहण
Next articleमुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे 8 दिवसात न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार रास्ता रोको
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here