Home पुणे मौजे केडगाव ता.दौंड जि.पुणे येथील बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे...

मौजे केडगाव ता.दौंड जि.पुणे येथील बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे चोरणारा जेरबंद यवत गुन्हे शोध पथकाची खेरवा मध्यप्रदेश येथे कारवाई

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0038.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे
मौजे केडगाव ता.दौंड जि.पुणे येथील बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे चोरणारा जेरबंद
यवत गुन्हे शोध पथकाची खेरवा मध्यप्रदेश येथे कारवाई
दिनांक ३१/०७/२०२२ रोजी फिर्यादी अनुराधा आनंद चांडक रा.पुणे मुळ रा.उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली की मौजे केडगाव गावचे हद्दीत हॉटेल समाधान समोर श्री विश्व ट्रॅव्हल्स बस नंबर एम एच २४ ए. बी.७५०० मध्ये फिर्यादी बसलेल्या जागेवरून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व कागदपत्रे असे एकूण ११,१३,५००/- रुपये चा मुद्देमाल चोरीस गेले बाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात होता.
त्यानंतर यवत गुन्हे गुन्हे शोध पथकाने रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करून सदर हॉटेलचे सी.सी. टी.व्ही.फुटेज प्राप्त करून त्यातील एका संशयित इसमा विषयी माहिती घेण्यास सुरुवात केली सदरचा संशयित इसम हा धरमपुरी ता.मनावर जि. धार मध्यप्रदेश येथील असलेची माहिती यवत गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार निलेश कदम,गुरुनाथ गायकवाड,पोलीस नाईक अक्षय यादव यांचे पथकाला खबऱ्या मार्फत माहिती मिळालेने वरील पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन वरील संशयित इसमाचा शोध व माहिती घेण्यास सुरुवात केली सलग ७ दिवस खलघाट,धरमपुरी,मनावर,उमरबन, खेरवा मध्यप्रदेश या भागात संशयित इसमाचा शोध घेतला असता सदर इसम खेरवा ता.मनावर जि. धार येथे असलेची माहिती वरील पोलीस पथकास मिळाले नंतर मनावर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अलवा व यवत पोलीस स्टेशन पथकाने इसमनामे इस्माईल बाबू खान वय ३६ रा.धरमपुरी बायपास ता.मनावर जि.धार राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन उमरबन पोलीस चौकी येथे आणून सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल करून गुन्हयातील चोरीस गेलेले १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण किंमत रुपये ९,३६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दोन दिवस पोलीस कास्टडी रिमांड मंजूर केली असून सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि स्वप्नील लोखंडे, यवत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव,दामोदर होळकर,वसीमोद्दीन शेख अकोला,पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.

Previous articleश्री ज्ञानेश्वर मंदिर मुखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन
Next articleमहिला टोल कर्मचारी अन् पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here