Home पुणे सचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन …

सचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन …

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_183627.jpg

सचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन …

पुणे(वारजे) युवा मराठा प्रतिनिधी:-विलास पवार. सालाबादप्रमाणे इफ्तार पार्टीचे नियोजनातुन वारजे परिसरातील हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित राहिले पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्यांचा अंगीकार झाला पाहिजे या प्रामाणिक हेतुने सचिन दशरथ दांगट हा एक भाजपा कार्यकर्ता गेली काही वर्ष हे नियोजन करीत आहे .
संपूर्ण जगामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन रमजानच्या पवित्र महिन्यातील इफ्तार पार्टीचा सण साजरा केला जातो. मानवतेच्या भावनेतून सर्व धर्मीयांनी एकमेकांचे सण साजरे केल्याने समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते. सर्व दरम्यान कडून असे सामाजिक उपक्रम राबविले जावेत यासाठी प्रयत्न व्हावेत कुठलाही अफवांवर विश्वास न ठेवता , समाजा समाजामध्ये तेढ निर्माण न होता सामाजिक सलोखा हा कायम जपला जावा असे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी सांगितले .
काही विध्वंसक प्रवृत्ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपा हा पक्ष मुस्लीम विरोधी पक्ष असल्याचे चुकीचे चित्र समाजात पसरविण्याचे काम करीत आहे . हा गैरसमज दुर व्हावा आणि वारजे परिसरातील हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित रहावे या प्रामाणिक हेतुने या इफ्तार पार्टीचे नियोजन करीत असल्याचे संयोजक सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले .
जगातला कुठलाच धर्म वाईट वागण्यास , वाईट कृत्य करण्यास सांगत नाही . आपण सगळ्यांनी या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे हे सांगत असताना वारजे परिसरातील अनेक स्थानिक प्रश्नांवर मा.ऊपमहापौर दिलीपभाऊ बराटे यांनी अभासपुर्ण उत्तरे दिली . रमजानच्या पवित्र महिन्यातील उपवासाचे महत्व सांगत असताना काही विध्वंसक प्रवृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करित असल्याचे नियोजन मंडळाचे सदस्य श्रीकृष्णदादा बराटे यांना सांगितले . शिक्षण मंडळ मा. अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी समस्त वारजेकर हे सर्वधर्मसमभावाने एकत्र येऊन एकमेकांचे सण साजरे करण्यात धन्यता मानणारे असल्याचे सांगितले .पैंगबर शेख यांनी मुस्लीम समाजास येणारे काही अडचणींबाबत प्रकाश टाकला .
आजच्या इफ्तार पार्टीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भीमरावअण्णा तापकीर , मा. उपमहापौर दिलीपभाऊ बराटे , वारजेगावचे सरपंच श्रीकृष्ण बराटे , मा. शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ , नगरसेवक दिलीप वेडे पाटील , नगरसेवक किरण बारटक्के , स्वीकृत नगरसेवक संजय भोर , पैगंबर शेख आलम पठाण , हमीद शेख , अनवर शेख , रफिक शेख , अमजद अन्सारी , सुभाष अग्रवाल , अनिल भंडारी , ऋषिकेश रजावत , व्यंकटेश दांगट , चेकमेट टाइम्स चे धनराज माने , साद प्रतिसादचे राजीव पाटील, दैनिक लोकमतचे सचिन सिंग , सलीम शेख , दैनिक पुढारीचे प्रदीप बलाढे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने केले होते .

Previous articleपंढरपुरात मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामास सुरुवात
Next articleनवनीत राणांना”सुप्रीम कोर्टाचा दिलासा”जात प्रमाणपत्र बाबत दिला महत्त्वाचा निकाल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here