Home पुणे गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प प्रदान सोहळा पुणे...

गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प प्रदान सोहळा पुणे येथे संपन्न

80
0

Yuva maratha news

1000315162.jpg

गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प प्रदान सोहळा पुणे येथे संपन्न

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

पुणे-चिंचवड येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात, 20 एप्रिल 2024 रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय विविध कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमास समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, डॉ.आशा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक रक्षक समिती, डॉ महेंद्र देशपांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ,
डॉ.प्रा. श्वेता सचिन चौगुले ,सिध्दरेखा फाऊंडेशन भारत संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉ. सूनिलसिंह परदेशी आदी मान्यवर प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
प्रास्ताविक डॉक्टर सुनील सिंह परदेशी यांनी केले तर मनोगत पद्मश्री गिरीजी प्रभुणे, डॉक्टर आशाताई पाटील व डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉ. विरेंद्रसिंग टिळे यांना गांधी पिस इंन्टरनॅशनल अॅबेस्टेर पदवी बहाल करण्यात आली.
गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ह्यावेळी आयोजक डॉ . राजेंद्रसिंह वालीया डॉ. विरेंद्रसिंग टिळे, डॉ.राजेंद्र आहेर डॉ .आरती अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले.
मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थींनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here