Home पुणे ख्रिस्ती बांधवांनी रविवारी झावळ्यांचा रविवार अर्थातच‘पाम संडे’साजरा केला

ख्रिस्ती बांधवांनी रविवारी झावळ्यांचा रविवार अर्थातच‘पाम संडे’साजरा केला

143
0

आशाताई बच्छाव

IMG_20240325_152106.jpg

ख्रिस्ती बांधवांनी रविवारी झावळ्यांचा रविवार अर्थातच‘पाम संडे’साजरा केला
पुणे ब्युरो चिप उमेश पाटील
ख्रिस्ती बांधवांनी ,झावळ्याची मिरवणूक काढून झावळ्याचा सणसाजरा केला
येशू व त्याचे शिष्य यरूशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठवले, त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या. जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.” हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे का सियोनेच्या कन्येला सांगा,
पाहा, तुझा राज लीन होऊन
गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”
तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले,दावीदाच्या पुत्राला होसान्ना.
प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे.परम उंचामध्ये होसान्ना!”
दापोडी बोपोडी सांगवी कासारवाडी खडकी येथील चर्चेस मध्ये झावळ्यांचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या वेळी महिला व लहान मुले मोठ्या प्रमाणात होते. या वेळी सेंट मेरी कथिड्रल चर्च खडकी, होली क्रॉस चर्च, सॅल्वेशनआर्मी चर्च,
विनीयार्ड वर्क चर्च, या चर्चेसमध्ये. ,उपासना भक्ती संदेश देण्यात आला झावळ्यांचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

Previous articleआसई येथील योगेश कोरडे यांचा ट्रक्टर पलटी होऊन अपघाती मृत्यू
Next articleभावनांचे विश्व
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here