Home जालना आसई येथील योगेश कोरडे यांचा ट्रक्टर पलटी होऊन अपघाती मृत्यू

आसई येथील योगेश कोरडे यांचा ट्रक्टर पलटी होऊन अपघाती मृत्यू

114
0

आशाताई बच्छाव

IMG_20240325_151824.jpg

आसई येथील योगेश कोरडे यांचा ट्रक्टर पलटी होऊन अपघाती मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 25/03/2024
सविस्तर वृत्त असे की, दी.24 वार रविवार या दिवशी मयत योगेश हा होळीचा सण असल्याने आपल्या आईला सांगून गेला की, मला पुरण पोळी करुण ठेव मी कामावरून लवकर येतो. असे सांगून कामावर निघून गेला. मयत योगेश कोरडे वय अवघे 20 वर्ष हा जाफराबाद तालुक्यातील आसई येथील रहिवाशी होता. त्यांचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सीपोरा बाजार शिवारात घडली. योगेश पांडुरंग कोरडे हा सकाळी कामावर गेला होता. मक्याचे पोते घेऊन विक्रीसाठी ट्रॅक्टर सीपोरा बाजार येथून माघारी निघाले होते. दरम्यान गावाकडे येतांना वळन रस्त्यावर ट्रक्टर पलटी झाले. यामध्ये बसलेला योगेश कोरडे ट्रॉली खाली दाबला. यावेळी त्याला नागरिकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वडील वर्षभरापासून अर्धांग वायू झाल्याने घरातच अंथरुणावर पडून आहे. त्यामुळे घराची जबाबदारी योगेशच्या खांद्यावर होती. शेतात माल होत नसल्याने घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आसई तसेच परिसरातून हळहळ व दुःख व्यक्त होत आहे.

Previous articleलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, आचारसंहिता कालावधीत १७ गुन्हे झाले दाखल…
Next articleख्रिस्ती बांधवांनी रविवारी झावळ्यांचा रविवार अर्थातच‘पाम संडे’साजरा केला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here