Home अमरावती अजित पवार, सुनित्रा पवार हे सप्लीमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका.

अजित पवार, सुनित्रा पवार हे सप्लीमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका.

21
0

आशाताई बच्छाव

1000302363.jpg

अजित पवार, सुनित्रा पवार हे सप्लीमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका.
_______
दैनिक युवा मराठा
पी. एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
बारामती मतदारसंघातून आतापर्यंत सुप्रिया सुळे यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्यापेक्षा यंदा विक्रमी मतदानी निवडून येतील. बारामती मतदारसंघावर नेहमी शरद पवार यांचा प्रभाव राहिला आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार तसेच अन्न कोणी असतील ते सप्लीमेंट्री आहे. शरद पवार आहे म्हणून ते आहे अ संजय राऊत अशी बोचरी टीकायांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा नवा वाट पेटण्याची शक्यता आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दोन दिवस अमरावती दौऱ्यावर होते. गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एक मोठे वक्तव्य केले. बारामती मतदारसंघातून आतापर्यंत सुप्रिया सुळे यांनी ज्या निवडणुका लढविल्या, त्यापेक्षा विक्रमी मतांनी निवडून येतील. बारामती शिवसेना, काँग्रेस अन्य मित्र पक्ष सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करतील, असे ते म्हणाले. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर राजकीय संकट आले तेव्हा तेव्हा विदर्भात चमत्कार झाला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात सर्वाधिक, तर राज्यात महाविकास आघाडी ३५ जागा जिंकणार, असा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना ही ठाकरेची आहे. आणि त्यांचीच राहील, तर वंचित च्या प्रकाश आंबेडकर सोबत मैत्री कायम असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला. पत्र परिषद ला माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here