Home जालना जाफराबाद सह तालुक्यातील माहोरा, टेंभुर्णी येथे मुसळधार पाऊस विज पडून एक म्हैस...

जाफराबाद सह तालुक्यातील माहोरा, टेंभुर्णी येथे मुसळधार पाऊस विज पडून एक म्हैस ठार

235

आशाताई बच्छाव

1000293660.jpg

जाफराबाद सह तालुक्यातील माहोरा, टेंभुर्णी येथे मुसळधार पाऊस विज पडून एक म्हैस ठार
माहोरा प्रतिनीधी-मुरलीधर डहाके
दिनांक 16/04/2024/
सविस्तर वृत्त असे की,जाफराबादसह तालुक्यातील माहोरा व टेंभुर्णी येथे दिनांक 16 रोज मंगळवार या दिवशी दुपारी पाच वाजता अचानक आभाळ येवून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस आणि वारा खूप मोठ्या प्रमाणात अचानक सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली. वारा आणि पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाटही मोठया प्रमाणात होता. शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊसात कांदा व मका पिकाचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. चार पाच दिवसा अगोदरही वारा आणि गारांचा पाऊस झाला होता. त्यातही मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तरी शासन दरबारी दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. टेंभूर्णी येथील शेतकरी श्री संतोष शिंदे यांची म्हैस झाडाखाली बांधलेली होती.त्या म्हसीला गोठ्यात घेऊन जाण्याच्या तयारीत होते परंतु त्याअगोदर विज कोसळून म्हैस जागीच ठार झाली. म्हैस अंदाजे एक लाख रुपये किंमतीची होती. तरी तहसीलदार साहेबांनी पंचनामा करून संतोष शिंदे यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी टेंभूर्णी गावकऱ्यांकडून होत आहे.

Previous articleजालना शहरातील बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी
Next articleअजित पवार, सुनित्रा पवार हे सप्लीमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.