Home जालना जालना शहरातील बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी

जालना शहरातील बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी

26
0

आशाताई बच्छाव

1000293658.jpg

जालना शहरातील बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक -16/04/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की, जालना शहरातील प्रसिद्ध अशी बडी सडक या रस्त्याचे सिमेंट बांधकाम करण्यात आले असून रस्ता चांगला झाल्याने या रस्त्यावर सुरुवातीपासूनच रहदारी जास्त होती आणि आता रस्ता झाल्यापासून जास्तीची रहदारी वाढली आहे.परंतु बडी सडक रोडवर सतत अति वेगवान व सुसाट वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.या अनियंत्रित वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे येथील रहिवासी व ये -जा करणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती, पुरुष,महिला, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे.या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. भविष्यातील अपघात रोखण्यासाठी जालना महानगर पालिका प्रशासनाने बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे शहरात बुलेट सारख्या गाड्यांच्या आवाजाने फार मोठा ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्कश आवाजाने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.याकडेही पालीका प्रशासन व पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित वाहन चालकांवर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.विशेष म्हणजे रस्त्यावर कसेही वाहने उभी करण्यात येतात त्यामुळे ये -जा करणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होते.अशा वाहनधारकांनाही समज देऊन शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.कुठलीही अनुचित दुर्घटना घडण्याअगोदरच पालीका प्रशासनाने नागरिकांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करून त्वरित बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्यात यावेत अशी रास्त मागणी शहरातील नागरिकांनी पालीका प्रशासनाकडे केली आहे.

Previous articleकुच्चरवटा येथील कुंटण खाण्यावर छापा टाकून 03 पुरुष आरोपीसह 01कुंटनखाना चालविणारी महिला अटकेत.
Next articleजाफराबाद सह तालुक्यातील माहोरा, टेंभुर्णी येथे मुसळधार पाऊस विज पडून एक म्हैस ठार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here