Home नांदेड आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.

आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0018.jpg

आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था उंद्री (प.दे.) द्वारा संचलित आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन व अमृत मोहत्स्व मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र पिता म. गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. तसेच तिरंगा राष्ट्र राष्ट्र ध्वजरोहन संस्थेचे संचालक प्रा. एम. एल. सोनकांबळे यांनी केले. त्याचबरोबर स्कूल च्या प्राचार्या सौ. सुनंदा मॅडम, प्रियांका मॅडम, शेख शामिना मॅडम, रुपाली अकुलवार मॅडम, दिव्या मॅडम, शिला ताई, आशिष वाघमारे, राष्ट्रपाल कांबळे, यांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे,माजी. नगर सेवक सुशीलकुमार देगलूर, डॉ. उत्तमकुमार इंगोले साहेब शिवराज कांबळे, प्रकाश सोनकांबळे, महेंद्र कांबळे, देविदास कांबळे, दासेटवार सर, नाईक साहेब, या सर्व मान्यवरांचे पुष्पहार, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व पालक मंडळीचे गुलाब पुष्प देऊन येथोच्छ सन्मान करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्रा.मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे यांनी केले. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा ऐतिहासिक आढावा सगितला. भारताला स्वातंत्र्य सहज मिळले नसून त्यासाठी असंख्य क्रांतीकारकाना प्राणाची आहुती द्यावी लागली. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाष चंद्रबोस, लाला लजपतराय, जतिन दास, यासारख्या अनेक क्रांतीवीरांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःचे आयुष्य समर्पित केले. आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत भूमीला मुक्त केले. तसेच म. गांधीजींनी इंग्रजांचे काळे कायदे रद्द केले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या बाळाने विविधतेने नटलेल्या भारत देशातील नागरिकांना एक संघ ठेवण्याचे व समता,स्वातंत्र्य, बंधुता, अबाधित ठेवण्याचे अनमोल योगदान भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिले. म्हणून आज आपला देश जगात सन्मानाने आपली शान उंचावत आहे. याविषयी सविस्तर मांडणी केली. तसेच यावेळी आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील अमृता संदीप कांबळे, गौतमी गौतम सोनकांबळे, आरुषी उत्तम कांबळे, माहीम महेबुब कासार, आदिबा महेबुब कासार, श्रुतिका बालाजी डूडलवार, समीक्षा सुनील नरबागे, सार्थक राजेश भुताळे, विकलप दिलीप कांबळे, हर्ष राजेंद्र निलमवार, रितेश पिटलावड, सोहन शिवराज कांबळे, सोहम कुऱ्हाडे,अशा अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इंग्रजी भाषेतून भाषणे केली व स्वातंत्र्य दिन आणि अमृत मोहत्स्व दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सांस्कृतिक नृत्य देशभक्ती पर गीतावर करण्यात आले. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेख शमिना मॅडम यांनी केले. तर आभार प्रियंका मॅडम यांनी मांडले.

Previous articleवरवट बकाल ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून आजी-माजी सैनिकांचा सत्कार
Next articleश्रीक्षेत्र पैठण येथे छावा क्रांतिवीर सेनेचे आठवे राष्ट्रीय महा अधिवेशन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here