• Home
  • *एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार,* *खा.शरद पवारांचे आश्वासन*

*एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार,* *खा.शरद पवारांचे आश्वासन*

*एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार,* *खा.शरद पवारांचे आश्वासन*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

ऐन दिवाळीच्या तोंडावर एस.टी. कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि एस. टी. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना प्रतिनिधींना दिले आहेत.

एस.टी. कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी खा. शरद पवारांनी आश्वासन दिल्याचे एस. टी.कामगार संघटना प्रतिनिधींनी सांगितले. या भेटीत एस.टी. संघटनेच्या प्रतिनिधींनी थकीत वेतनाबाबत चर्चा केली व या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.

कोल्हापूर प्रतिनिधी
मोहन शिंदे

anews Banner

Leave A Comment