Home Breaking News येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला मृतदेह!

येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला मृतदेह!

126
0

येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला मृतदेह! प्रतिनिधी येवला( प्रविण अहिरराव. युवा मराठा न्युज नेटवर्क) येवला l बोकटे येथे बुधवार दि.२८ आक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोळगंगेच्या किनाऱ्यावर विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर महिलेची ओळख झाली असुन सायगाव येथील मेंढपाळ करणाऱ्या मुक्ताबाई दत्तात्रय भालेराव अंदाजे वय ३१ हल्ली मुकाम अंदरसुल,ह्या आपल्या कुटुंबासह बोकटे परिसरात मेंढपाळ व्यवसाय करत असून बोकटे येथील कोंबडवाडी शेजारीच तात्पुरत्या स्वरूपात पाल तयार करून राहत असून बोकटे पोलीस पाटील सुरेश दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला ग्रामीण प्रभारी पी.आय.भिसे,ए.पी.आय.रजपूत यांच्यासह ए.पी.आय.तांदाळकर पो.हवालदार पगार पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले व त्या महिलेस ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतुन बाहेर काढले,मृत्यू देहला येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे.येवला पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून सदर घटनेचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून पुढील तपास येवला ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous article*एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार,* *खा.शरद पवारांचे आश्वासन*
Next articleकोंबड्याच्या नादाला जाऊ नका ! कोंबड्यानं केला पोलिसाचा मर्डर, गावकरी हैराण!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here