Home Breaking News कोंबड्याच्या नादाला जाऊ नका ! कोंबड्यानं केला पोलिसाचा मर्डर, गावकरी हैराण!

कोंबड्याच्या नादाला जाऊ नका ! कोंबड्यानं केला पोलिसाचा मर्डर, गावकरी हैराण!

95
0

कोंबड्याच्या नादाला जाऊ नका ! कोंबड्यानं केला पोलिसाचा मर्डर, गावकरी हैराण!फिलिपाईन्स,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- कोंबडा म्हटला की कोंबडीचा रस्सा केला जातो.मात्र तुम्ही कधी कोणत्या कोंबड्यानं जीव घेतल्याचे ऐकले आहे का? नाही ना..पण हे सत्य आहे. कोंबड्यानं चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना फिलिपिन्स मधील एका गावात घडल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे सर्व गावकरी देखील हैराण झाले आहे. कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढाईत छापा टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कोंबड्यानं हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहेकोबड्यांच्या लढाईत सामिल असलेल्या या फायटर कोंबड्याच्या पायावर ब्लेड होते. पोलीस अधिकारी त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर त्याचीच ब्लेडनं रक्तवाहिनी (Artery) कापली गेली. यामुळे पोलीस अधिकारी लेफ्टनंट क्रिस्टिचन बोलोक यांचा मृत्यू झाला.

बोलोक हा कोंबड्यांच्या बेकायदेशीर खेळाविषयी पुरावे गोळा करण्यासाठी तेथे गेला होता, अशी माहिती मिळतेय.डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोंबडीच्या पायाच्या धारदार ब्लेडनं क्रिस्टिचन बोलोकच्या डाव्या मांडीच्या धमनीत अडकले आणि कापले गेले.

यामुळे पोलिस कर्मचार्‍याच्या पायातून बरेच रक्त गेले. तसेच फिलिपिन्समध्ये कोंबडीच्या लढाईला ‘तुपडा’ म्हणतात आणि ते खूप लोकप्रिय आहे. लोक त्यावर पैसे खर्च करतात आणि ते जुगार म्हणून प्रसिद्ध आहे, असे पोलिसांचे प्रमुख कर्नल आर्नेल आपुद यांनी सांगितले.

फिलिपिन्समध्ये कोंबडीच्या लढाईला ‘तुपडा’ असे म्हटले जाते. या लढाईत कोंबड्यांच्या पायावर ब्लेड लावले जाते. लढाईसाठी कोंबड्यांच्या पायात ब्लेड ठेवले जाते, ज्याला गॅफ म्हणतात.

दरम्यान कोरोनामुळे अशा खेळांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या लोकांना पकडण्यासाठी गेलेल्या बोलोक यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

Previous articleयेवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला मृतदेह!
Next article*देवळ्यात कांदा चोरीचे सत्र सुरूच ; वाखारवाडीत कांदा चाळीचे तोडले कुलूप ; अज्ञात चोरट्यानी कांद्यावर मारला डल्ला*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here