• Home
  • *देवळ्यात कांदा चोरीचे सत्र सुरूच ; वाखारवाडीत कांदा चाळीचे तोडले कुलूप ; अज्ञात चोरट्यानी कांद्यावर मारला डल्ला*

*देवळ्यात कांदा चोरीचे सत्र सुरूच ; वाखारवाडीत कांदा चाळीचे तोडले कुलूप ; अज्ञात चोरट्यानी कांद्यावर मारला डल्ला*

*देवळ्यात कांदा चोरीचे सत्र सुरूच ; वाखारवाडीत कांदा चाळीचे तोडले कुलूप ; अज्ञात चोरट्यानी कांद्यावर मारला डल्ला*
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा :कांद्याची चोरी होण्याच्या घटनेत तालुक्यात वाढ होतांना दिसत असून, वाजगाव येथील कांदा चोरिची घटना ताजी असतानाच तालुक्यात मंगळवारी (दि २७) रोजी रात्री वाखारवाडी येथे पुन्हा कांदा चोरीची घटना समोर आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे . सद्या बाजारात भाजीपाल्या बरोबरच इतर पिकांनाही चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतमालाच्या चोऱ्यात वाढ झाली आहे. वाखारवाडी ता देवळा येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले होते. बाजारात कांद्याचे दर चढ-उतार होत असल्याने व निश्चित भाव मिळत नसल्याने शेतकरी चाळीतच कांदा साठवण्यावर भर देतात. त्याप्रमाणे निकम यांनी मालेगांव / देवळा रस्त्यावर कर्ल्या नाल्यालगत असलेल्या शेतातील ( गट नं. ६३१ ) चाळीत कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने साठवून ठेवला होता. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीचे कुलूप व जाळी तोडून शिल्लक असलेल्या कांद्यापैकी 10 ते 15 क्विंटल कांदा लंपास केला.श्री निकम यांचे आजच्या बाजार भावा प्रमाणे जवळपास ९० ते एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे बुधवारी बाजीराव निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. तालुक्यात कांदा चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान , एन सणासुदीच्या दिवसात गेल्या दोन दिवसांपासून कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, चाळीत आहे तो कांदा सडून जात असल्याने त्यात कांदा चोरीच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे
आधिक तपास देवळा पोलीस निरिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment