Home नांदेड जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला गरीबांची डाळ शिजेना

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला गरीबांची डाळ शिजेना

82
0

राजेंद्र पाटील राऊत

*कोरोना अन् महागाईमुळे सर्वसामान्य हताश..*

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला गरीबांची डाळ शिजेना

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ तर कधी अवकाळी अतिवृष्टी तर कधी ढग फुठी यासारख्या परिस्थितीमुळे उत्पादनात होणारी घट ही वाढत्या महागाईची कारणे ठरत आहेत, परंतु यामुळे होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
आधीच दुष्काळ व त्यात तेरावा महिना ( अधिक मास ) या मराठीतील म्हणीप्रमाणे सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईचा सामना करत असताना समोर आणखीन कोरोना सारखे संकट परत आले आहे. एक तर कोरोना संकटामुळे शहरात नोकरी संदर्भात वास्तव्यास असणाऱ्या बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारीचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. आणि सततची होणारी दरवाढ यामुळे सर्वसामान्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यातच शेतीमालाला असलेल्या कमी दरामुळे व उत्पादनात घट होणार या शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कोलमडली आहे.

▪️
व्यवसाय करणे परवडत नाही
किराणा मालातील खाद्यातेला सह शेंगदाणा कडधान्यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ महिन्याभरात झाली आहे. ग्राहक आम्हाला महागात वस्तु विकत असल्याच्या तक्रारी करतात परंतु घाऊकामध्ये किंमती वाढल्या तर आम्हालाही व्यवसाय करणे परवडत नाही.
एक किराणा दुकानदार
▪️
ताळमेळ बसविताना दमछाक
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे त्या तुलनेत उत्पादन बरेच घटलेले आहे. शेतीमाल शिकुन मिळणा-या पैशात पुढील शेतीचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दुध, गँस सिलेंडर, किराणा, भाज्या या सगळ्यांचा ताळमेळ बसवताना दमछाक होत आहे.

▪️
आमची सोयाबीन चार हजार ते साडेचार हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करतात आणि आम्हांला त्यात सोयाबीनचे तेल १५० रुपये किलो दराने घ्यावे लागते. आमच्या शेतीमालाला भाव नाही, परंतु आमच्या शेतमालावर प्रक्रिया करून दुप्पट-तिप्पट भावानी विकून आमचीच लूट केली जात आहे.
मनोज पाटील बनबरे,
संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष मुखेड

▪️
जीवनावश्यक वस्तू चे सध्याचे बाजार भाव
खाद्यतेल १५० रु प्रतिकिलो
शेंगदाणा १२० रु प्रतिकिलो
साखर ३५ रु प्रतिकिलो
मुगदाळ ९० / १०० प्रतिकिलो
उडीदडाळ ११० /१२० रु.प्रतिकिलो
तांदूळ. ५५/६५ रु प्रतिकिलो

Previous articleबेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार , रोहा- सालाव रस्त्यावर हृदयद्रावक घटना 🛑
Next articleजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १००% मतदान…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here