• Home
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १००% मतदान…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १००% मतदान…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210402-WA0082.jpg

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १००% मतदान…

▶️मुखेड तालुक्यातील 67 मतदारापैकी 67 मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी आज मुखेड तहसील कार्यालयात मतदान घेण्यात आले होते.मुखेड तालुक्यातील सर्व मतदारानी मतदान केंद्रावर कोरोना नियमाचे पालन करत विक्रमी असे १०० टक्के मतदान केले आहे.
मुखेड तालुक्यातील झालेले मतदान पुढील प्रमाणे (अ) मतदारसंघात 35 मतदार मतदान 100 टक्के (ब) मतदारसंघात 11 मतदार मतदान
100 टक्के (क) मतदारसंघात 21 मतदार मतदान 100 टक्के अश्याप्रकारे एकुण मतदान १०० टक्के झाले आहे.
मुखेड तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी 08.00 ते 04.00 ही वेळ देण्यात आली होती पण मतदारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व मतदार संघात १०० टक्के मतदानाचा हक्क बजावला.
जि.म.स.बँकेच्या मतदान केंद्रावर केंद्राअध्यक्ष म्हणुन काशीनाथ पाटील तहसिलदार हे स्वतः होते तर आर.आर पदमावर (ना.तह.) सहा मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी म्हणुन काम पाहिले तर मतदान केंद्रावर जि. एस.शेख,एम एल कांबळे,एस आय भुरे एस यु कुलकर्णी यांंची मतदान केंद्रावर साह्यक कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती.
कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आलेली होती.सर्व मतदान प्रक्रिया शांतेत पार पडली आहे.मतदान संपल्यानंतर मा.निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय,नांदेड येथे मतपेट्या जमा करण्यासाठी 4.15 वाजता पथक रवाना झाले.अशी माहिती तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment