• Home
  • कोवीड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा गृहविलगीकरणातील रुग्णांची घरोघरी जावून तपासणी करा

कोवीड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा गृहविलगीकरणातील रुग्णांची घरोघरी जावून तपासणी करा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210402-WA0089.jpg

कोवीड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा
गृहविलगीकरणातील रुग्णांची घरोघरी जावून तपासणी करा
पत्रकार सतिश घेवरे युवा मराठा न्युज नेटवर्क  मालेगाव
कृषीमंत्री दादाजी भुसे
_कायद्यान्वये गरजेनुसार संस्था, रुग्णालये अधिग्रहीत करण्याचे निर्देश_

▪️आजच्या घडीला सुमारे 1 हजार 531 रुग्ण हे गृहविलगीकरणात असून अशा रुग्णांची घरोघरी जावून तपासणी करण्याच्या सूचना मंत्रीमहोदय ना.दादाजी भुसे यांनी केल्या.

▪️शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती,याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते.

आज जवळपास 76 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत याठिकाणी सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन करावे. अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करा, गरज भासल्यास कायद्याचा वापर करून गरजेनुसार खाजगी संस्था, रुग्णालये अधिग्रहीत करण्याचे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.

आरोग्य प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेता,
चांदवड येथील ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे. त्याचबरोबर दाभाडी येथील 30 बेडची क्षमता वाढवून 50 पर्यंत न्यावी. मनमाड येथील रेल्वे प्रशासनाचे रुग्णालय कोवीडसाठी कार्यान्वित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात.

शहरातील मन्सुरा हॉस्पीटल कार्यान्वित करण्यात यावे. महात्मा ज्योतीबा फुले योजनेतील शहरातील सहा रुग्णालयांचा आढावा घेवून तेथे रुग्णांची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

anews Banner

Leave A Comment