Home रत्नागिरी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात

मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0026.jpg

मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात                                                          रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गोपाळकाला दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर चाफे मयेकर महाविद्यालयीन विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालय तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा उत्सव बेंजोच्या वाद्यावर नृत्याच्या साहाय्याने प्रत्यक्ष दहीहंडी फोडून हा पारंपारिक सांस्कृतिक उत्सव अतिशय उत्साहाने, मनमुरादपणे साजरा केला.

गोपाळकाला दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात गोपाळकाला पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दहीहंडीचा उत्सव आनंदाने साजरा केला. बॅन्जोपार्टीच्या वाद्यावर नाच नृत्याच्या सहाय्याने अतिशय प्रसन्न आणि धार्मिक पद्धतीचा सांस्कृतिक उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला. गोविंदांना ही संधी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर यांनी उपलब्ध करून दिली.

श्रीकृष्ण जन्मदिनाचे औचित्य साधून मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील यांनी गोपाळकाला-कालाष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण जन्म, श्रीकृष्ण अवतार आणि भारतीय संस्कृती या संदर्भात अतिशय ओघवत्या शैलीत अभ्यासपूर्ण असे या दिवसाचे महत्त्व विशेद करून विद्यार्थ्याला विविध प्रसंगातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण यांच्या संदर्भातील समाज प्रबोधनाचे साहित्य वाचून समजून घेण्याचे आवाहन केले. यावेळी मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव, युवा नेते रोहित मयेकर, ऋषिकेश मयेकर, सुरेंद्र माचिवले, जाकादेवीचे वृत्त संकलक संतोष पवार, युवा कार्यकर्ते बंटी सुर्वे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, शिरीष मुरारी मयेकर माध्यमिक विद्यालय व सुनिल मुरारी मयेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक महेश धनवडे, राजेश धावडे यांसह मार्गदर्शक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ, पालक,बेंजो वाद्यांची गावची टीम, गोविंदा बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleराजू श्रीवास्तवच्या ब्रेन डेड नंतर आता हृदय ही करत नाही काम
Next articleफोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांचा सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here