Home बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0059.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवी शिरस्कार, संग्रामपूर शहर
संग्रामपूर तालुक्यातील वरवट ते सोनाळ्याच्या कैची फाटा म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या, बावनबीर जवळ सुरु झालेल्या पुलाचे काम कंत्राटदारांना राजकीय अभय असल्याने, कामाचा नियमित पना राहत नसल्याने गेल्या कित्येक महिन्यापासून चालु असलेले बावनबीर जवळील पुलाचे बांधकाम अद्यापही अर्धवट झाले असल्यामुळे वाहतुक दारांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय होत असुन अपघात होण्याचे संभव नाकारता येत नाही. या पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक फलक सुद्धा लावलेले नाहीत,धोक्याचे वळण रस्त्याचे सूचना फलक सुद्धा दिसुन येत नाही, करिता कित्तेक दुचाकी स्वारांना रात्रीच्या वेळी अपघातास सामोरे जावे लागत आहे.
त्याचप्रमाणे याच रस्त्यावरून श्रावण महिन्यामध्ये मांगेरी महादेव आणी जटाशंकर कडे जाणाऱ्या हजारो भाविक भक्तांची खुप मोठी वर्दळ या रस्त्याने होत असते तसेच वरवट बकाल संग्रामपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बावनबीर गावासह टुनकी,सोनाळा या आदिवासी भागामधून शाळेतील अनेक विद्यार्थी तसेच नागरिकांची याच रस्त्याने ये-जा आहे, मेन रोड असल्या कारणाने याच रस्त्यावरून या भागातील अनेक रुग्णांची अंबुलन्स द्वारे वाहतुक होते अशा वाहतुकीची भरपूर वर्दळ असणाऱ्या पुलाचे काम कधी पूर्ण होईल ??
याकडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देतील ?
याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सार्वजनिक बांधकाम . विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रखडलेले काम त्वरित पूर्णत्वास न्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहतूकदार तथा विद्यार्थी वर्गाकडुन होत आहे

Previous articleपुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्रीयुत संजय वाघमारे आजचा लेख- एक चांगला पालक:
Next articleपाच महसुल मंडळातील तब्बल चार-हजार-आठशे- एकोणीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here