Home सामाजिक पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्रीयुत संजय वाघमारे आजचा लेख- एक चांगला पालक:

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्रीयुत संजय वाघमारे आजचा लेख- एक चांगला पालक:

103

आशाताई बच्छाव

Screenshot_20220724-104251_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्रीयुत संजय वाघमारे आजचा लेख- एक चांगला पालक: आज कालचा जग हे पूर्णपणे तंत्रज्ञान, व्हाट्सअप, फेसबुक या रचनेत विभागले गेले आहे.अशा या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांवरती चांगले संस्कार होणे गरजेचे आहे किंबहुना आता ते काळाचे बनले आहे. मोबाईल या उपक्रमामुळे प्रत्येक मुलाला मोबाईल वरती गेम खेळण्याची फार आवड लागली आहे भारतामध्ये सर्वे केले असता प्रत्येक पाच मुलांमध्ये एक मुलगा पूर्णपणे त्या गेमच्या आहारी गेलेला असतो मनोरुग्न डॉक्टरांकडे सुद्धा पाच पैकी दोन मुलांच्या केसेस आलेले असतात. त्यामुळे मुलांचे लक्षण चिडचिडेपणा अभ्यासाकडे दुर्लक्ष आई वडिलांना उलट सुलट बोलणे इत्यादी प्रकार आज वाढत चाललेले आहेत आपल्या मुलांना वाईट सवयी लागू नये यासाठी या सवयींपासून लांब ठेवले पाहिजे कारण या सवयींमुळे आता मुलांची गुन्हेगारी सुद्धा वाढत चाललेली आहे त्यामुळे येणाऱ्या भारताचे भवितव्य ही तरुण पिढी खराब होऊ नये यासाठी आपल्या प्रत्येक पालकांनी स्वतःहून जबाबदारी घेणे आज गरजेचे आहे. पालकांनी काय काळजी घ्यावी ते पाहू मुलांवरती लक्ष देणे मुलांकडे मोबाईल जाणार नाही याची खात्री करून घेणे मुलांना सतत टीव्हीसमोर कार्टून अथवा इतर कुठली कार्यक्रम जास्त वेळ बघू नये यासाठी काळजी घेणे. त्यांना आज मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा त्यामध्ये जुने खेळ पुन्हा परत येण्याची गरज आहे त्यामध्ये विटी दांडू खेळणे, रनिंग करणे योगा करणे सूक्ष्म व्यायाम करणे हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अभ्यास करून घेणे मुलांना समजावून घेणे त्यांच्याबरोबर आपला वेळ कसा जाईल याची काळजी घेणे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबरोबर थोडासा वेळ घालवला तर त्यांना एकटेपणा जाणवणार नाही मग ते या तंत्रज्ञानाच्या आहारी मोबाईल किंवा व्हाट्सअप टीव्ही इत्यादींच्या आहारी नक्कीच जाणार नाहीत ही काळजी आपण घ्यायला हवी व आपल्या मुलांना उज्वल भविष्यासाठी आपणही या मोबाईल पासून दूर राहणं गरजेचं आहे कारण प्रत्येक मूल हे आपल्या आई-वडिलांना आपल्या पाल्यांना अनुकरण करून वागत असते त्यामुळे त्यांच्यासमोर पालकांनी देवपूजा करणे चांगल्या सवयी ठेवणे पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करणे त्यांना शूरवीरांच्या कथा सांगणे त्यांना भारताचे स्वातंत्र्य दिवस आठवण करून देणे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहणे हे आपल्याला जमले पाहिजे तेव्हा कुठे येणारे भारताची पिढी उज्वल व चांगल्या भविष्यासाठी तयार होतील आजचा लेख या ठिकाणी थांबवतो लिहिण्यासारखे भरपूर आहे परंतु थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद..,.