Home Breaking News व-हाणे प्रकरणात आता युवा मराठा महासंघाच्या संघर्षाला अखेर यशाची किनार…!

व-हाणे प्रकरणात आता युवा मराठा महासंघाच्या संघर्षाला अखेर यशाची किनार…!

222
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230713-WA0047.jpg

व-हाणे प्रकरणात आता
युवा मराठा महासंघाच्या
संघर्षाला अखेर यशाची किनार…!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-व-हाणे,ता.मालेगांव येथील सामाजिक व विधायक कार्यासाठीच्या जागा प्रश्नावरुन सुमारे तीन वर्षापूर्वी सुरु झालेल्या संघर्षाला आता कुठे यश प्राप्त व्हायला सुरुवात झाली असून,जागा प्रश्नावर विरोध करणारे आता चांगलेच अडचणीत सापडले असून,त्यांच्या लबाडीचे व खोटया कामांचे प्रकरण चव्हाटयावर आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.सबंधित खोटे व लबाडीचे कामे करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने येत्या चार दिवसात लेखी स्वरुपात आपले मत मांडून खुलासा करावा अशी नोटीस पंचायत समिती प्रशासनाकडून जारी करण्यात आल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.
व-हाणे ता.मालेगांव ग्रामपंचायतीत ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे व सरपंच सौ.अनिता भरत पवार कार्यरत असताना,दिनांक ४ आँक्टोबर २०२१ रोजी गावात बेकायदेशीर व खोटी दिशाभूल करणारी ग्रामसभा घेऊन कागदोपत्री बनवाबनवी केलेली असल्याने प्रत्यक्षात या ग्रामसभेला अवघे ९५ नागरिक हजर असताना सुध्दा पदाचा गैरवापर करुन आणि कर्तव्यात कसूर करुन हि बोगस ग्रामसभा खरी असल्याचा केलेला दिखावा आता ग्रामसेविका सांळुखे व सरपंचाच्या चांगलाच अंगलट येणार असून,त्यानंतर खरे अर्थाने पुढील कायदेशीर प्रक्रीयेस सुरुवात होणार आहे.त्याशिवाय मालेगांवचे गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासना नुसार त्यांनाही आता व-हाणे प्रकरणातील दोषी गुन्हेंगारावर येत्या १३ आँगस्ट पर्यत गुन्हे दाखल करुन प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करावी लागणार आहे.अन्यथा त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात युवा मराठा महासंघाच्या माध्यमातून निश्चितच उमटणार आहेत,याची पुर्वकल्पनाही प्रशासनाला देण्यात आलेली आहे.व-हाणे प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here