Home बुलढाणा अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या सर्वपक्षीय भीमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा...

अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या सर्वपक्षीय भीमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0104.jpg

अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
सर्वपक्षीय भीमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
मोताळा: युवा मराठा न्यूज तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर                                              नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली या कारणावरून गावातील काही गाव गुंडांनी अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या केली असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे ज्या कुणी गावगुंडांनी अक्षय चा फोन केला असेल त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मोताळा तालुक्यातील सर्व पक्ष भीमसैनिकांनी मोताळा शहरात आठवडी बाजार ते तहसील कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी भोसा येथील बौद्ध तरुण शरद बेंडे यांच्या शेतीच्या वादातून खून करण्यात आला व मुंबईतील सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहामध्ये बौद्ध तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला व चिंचोली गुरुकुल तालुका देऊळगाव राजा येथील बौद्ध धर्माच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालणारे डीवायएसपी सिंदखेड राजाचे पोलीस निरीक्षक या जातीवादी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सह आरोपीला सादर करावे व या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. वरील अन्यायग्रस्त कुटुंबांना शासनाने तात्काळ 50 लाख रुपये रक्कम देण्यात यावी तसेच वेळेत कुटुंबातील व्यक्तींना शासकीय सेवेत रुजू करण्यात यावे व सर्व आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी या संपूर्ण मागणीसाठी मोताळा तालुक्यातील आंबेडकर विचारांचा अभिप्रेत असलेल्या सर्वपक्षीय भीमसैनिकांनी आठवडे बाजार परिसरातून तहसील कार्यालयापर्यंत या संपूर्ण घटनेचा निषेध करत जन आक्रोश मोर्चा काढला तसेच तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावेळी अरुण डोंगरे, नीलकंठ वानखेडे,साहेबराव डोंगरे ,लक्ष्मणराव गवई, संतोष मेढे ,मारुती वानखेडे, बाळासाहेब अहिरे ,अनिल खराटे, शेषराव गायकवाड ,श्रीकृष्ण शिरोळकर ,अतिश इंगळे, गौतम सरकाटे ,विनोद सावळे ,विनोद धुरंदर ,सुनील तेलंग ,गजानन अहिरे, शेख जमीर, मधुकर मोरे मिलिंद अहिरे, सय्यद वसीम यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleउद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात जाहीर सभा
Next articleशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सातसमित्या – अब्दुल सत्तार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here