• Home
  • जलपर्णी मुक्त झाल्याने पंचगंगेने घेतला मोकळा श्वास

जलपर्णी मुक्त झाल्याने पंचगंगेने घेतला मोकळा श्वास

इचलकरंजी : शहरातील पंचगंगा नदी घाटाच्या पात्राला जलपर्णीने विळखा घातला होता. जलपर्णी निर्मुलनासाठी २३ फेब्रुवारी पासून अमृत मामा भोसले युवा शक्ती,व्यंकोबा तालीम मंडळ,वरदविनायक बोट क्लब कार्यरत होते.गेल्या दोन दिवसापासून जयहिंद वाघाचे मंडळाचे माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव व रमाकांत जाधव यांनी सदर घाटावरील जलपर्णी हटवण्यासाठी स्वखर्चाने जेसीबीची व्यवस्था केली होती. त्यानंतर इचलकंजी नागरिक मंच, इचलकरंजी इलेक्ट्रिक असोसिएशन, इचलकरंजी परीट समाज, तसेच श्रीमंत शाहू नगर गणेशोत्सव मंडळ, बालगोपाल मंडळ विक्रमनगर यांनी आज सकाळी सहभाग घेऊन इचलकरंजी नगरपरिषदेच्या विजय पाटील व संजय कांबळे व आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांच्या सहाय्याने पंचगंगा नदीतील जलपर्णी काढून पंचगंगा जलपर्णीमुक्त केली.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment