Home कोल्हापूर युवकक्रांती महाआघाडीने विरोधकांना फटकारले.

युवकक्रांती महाआघाडीने विरोधकांना फटकारले.

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_080249.jpg

युवकक्रांती महाआघाडीने विरोधकांना फटकारले.

पेठवडगाव राहुल शिंदे: युवकक्रांती महाआघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहनलाल माळी म्हणालेकी आराखड्याबद्दल बरीच वर्ष चर्चा चालू आहे. सुरुवात ही विकास आराखड्याची यादव गटाने केलेली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले. जबाबदार व्यक्तीने खालच्या पातळी वर जाऊन माझ्यावर टीका केली. 2012 साली ठराव झाला. पुण्याच्या एजन्सीला वर्क ऑर्डर दिली.ज्यांनी कामाची सुरुवात केली.त्यांना जबाबदारी झटकता येत नाही.2021ला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी विरोध केलेला नाही.मी अल्पसंख्यांक असल्यामुळे माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांना सडेतोड उत्तर दिले जाईल्.असा इशारा माळी यांनी दिला.
माजी उपनगराध्यक्ष रंगराव बावडेकर म्हणाले की राजकारणा मध्ये एकमेकावर टीका करावी. पण खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये.आपण वडगाव शहरांमध्ये एक सुसंस्कृत आदर्श व्यक्तिमत्व आहात.
या बाबत गेली दोन वर्ष एक मेकांच्या वरती आरोप होत होते.युवक क्रांती महाआघाडीने खासदार धैर्यशील मानेंच्या साथीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आराखडा रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

Previous articleजागतिक महिला दिनानिमित्त बालाजी कोट येथे नवीन कार्यकारणी
Next articleआमलकी एकादशीचे व्रत – कथा आणि महत्व
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here