Home कोल्हापूर अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल:संदीप पाटील.

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल:संदीप पाटील.

142

आशाताई बच्छाव

IMG_20240403_211147.jpg

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल:संदीप पाटील.

पेठवडगाव राहुल शिंदे: हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव ही एक मोठी बाजारपेठअसून तेथील गाळे धारकांना बेदखल करण्याचे काम प्रशासकाने केले आहे.वडगाव नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत जुन्या सर्व गाळेधारकांना गाळे आहेत तेथेच गाळे द्यावेत , असे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या वतीने वडगाव शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी यांनाा देण्यात आले.
यावेळी संदीप पाटील म्हणाले की नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.या इमारतीच्या पूर्व बाजूस 14 पुनर्वसन केलेले गाळेधारक आहेत.या गाळेधारकांना नोटीस न देता फक्त तोंडी सूचना देऊन जागा खाली करण्यास सांगितले.गाळे धारकांच्यावर अन्याय झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. असे मनोगत संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
या वेळी विजय अपराध,सनी शिंदे,राकेश हाके,पप्पू माने,गोटू सावंत,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleएैतिहासिक झेंडा परिषदेत एकजुटीने होणार ‘जय लहुजी’ चा गजर
Next articleशेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.