Home वाशिम एैतिहासिक झेंडा परिषदेत एकजुटीने होणार ‘जय लहुजी’ चा गजर

एैतिहासिक झेंडा परिषदेत एकजुटीने होणार ‘जय लहुजी’ चा गजर

38
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_210808.jpg

एैतिहासिक झेंडा परिषदेत एकजुटीने होणार ‘जय लहुजी’ चा गजर

परभणी येथे पहिली राज्यस्तरीय परिषद

मातंग समाजाच्या समस्यांवर विचारमंथन

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- मातंग समाजाच्या विकासासाठी झटणार्‍या राज्यभरातील विविध मातंग संघटनांची एकजुटीची मोट बांधुन समाजाच्या विविध समस्यांवर विचारमंथन व निराकरणासाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या पुढाकारातून येत्या गुरुवार, ११ एप्रिलला परभणी येथे मातंग समाजाची पहिल्या राज्यस्तरीय एैतिहासिक झेंडा परिषदेची पायाभरणी होत आहे. या परिषदेला राज्यातील सर्व मातंग समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक तथा लहुजी साळवे बहूजन क्रांती सेनेचे अध्यक्ष राधाजी शेळके तथा जिल्हाध्यक्ष वासुदेव गायकवाड यांनी केले आहे.
मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीला सुरुवात होऊन ४२ वर्षे पुर्ण होत आहेत. या ४२ वर्षामध्ये समाजाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत तसेच अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढून आपले वेगळे सामाजिक अस्तित्व निर्माण केले आहे. समाजामध्ये आद्यक्रांतीवीर लहुजी साळवे, साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे, स्वराज्यासाठी लढलेले येल्ल्या मांग, सर्ज्या मांग, क्रांतीवीर फकीरा, शहीद पोचीराम कांबळे, शहीद चंद्रकांत कांबळे, असे अनेक आदर्श व्यक्तीमत्व होऊन गेले. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाज योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. देशातील व राज्यातील समाजामध्ये ’जय लहुजी’ या घोषवाक्यामुळे एकसुत्रता दिसत आहे. ती दिसत असली तरी व काही भागात एक झेंडा असला तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे झेंडे मात्र समाजाला एक ओळख देण्यात असमर्थ ठरत असल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे समाजात ’कोणता हा झेंडा घेऊ हाती असा प्रश्न ४२ वर्षापासून सतावत आहे आपला झेंडा एक नाही, आपले नेते एकत्रित येत नाहीत अशी समाजामध्ये नकारात्मक भावना दिसत आहे. समाजाची भावना आहे की, समाजाच एक झेंडा व्हावा आणि याच भावनेचा आदर करुन समाजाच्या सर्व छोट्या-मोठ्या संघटना व या संघटनाप्रमुखांनी मोठ्या मनाने एकजुटीने एका जागी येऊन मातंग समाजाच्या विकासासाठी झटावे. हा विचार घेऊन परभणी येथे आयोजीत मातंग समाजाची पहिली राज्यस्तरीय ऐतिहासिक झेंड परिषदेला देशातील व राज्यातील सर्व संघटना प्रमुखांनी त्यांच्या पदाधिकार्‍यांनी तसेच विविध क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांनी सहभागी होवून या ऐतिहासिक परिषदेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन वासुदेव गायकवाड यांनी केले आहे.

Previous articleभिमा नदीकाठावरील 3 फ्युज लाईट 8 तास तात्काळ चालू करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
Next articleअन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल:संदीप पाटील.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here