Home कोल्हापूर मराठा आरक्षण विरोधात भारतीय मराठा महासंघाची निदर्शने

मराठा आरक्षण विरोधात भारतीय मराठा महासंघाची निदर्शने

166
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा आरक्षण विरोधात भारतीय मराठा महासंघाची निदर्शने

पेठवडगांव:( युवा मराठा न्युज नेटवर्क)- मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्याणयामुळे सर्व मराठा समाजातून तिव्र नाराजी पसरली आहे. याला सर्वस्वी राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे . त्याबद्दल राज्यभरातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयावरून निषेध व्यक्त केला जात आहे .आज वडगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने काळ्या फिती लावून राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे बोलताना छत्रपती संभाजी महाराजांची विचारसरणी घेऊनच आपल्यालाआरक्षणाचा लढा द्यायचा आहे.आरक्षणासाठी कोणीही आत्महत्येचा विचार करूनये जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यत आपला लढा चालू ठेवायचा आहे.  इतर राज्यात ५०% च्या वर आरक्षण दिले जाते तर मग महाराष्ट्रात  का दिले जात नाही याला कारणीभूत राज्य व केंद्र सरकारच जबाबदारआहे.   यावेळी जिल्हासंघटक बोलताना प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची गूणवत्ता लपूनये यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेच आहे. असे प्रतिपादन भारतीय मराठा महासंघाचे जिल्हासंघटक संताजी भोसले सर यांनी केले.
जेष्ट नागरीक संघटनेचे सुर्यकांत हजारे म्हणाले कि मराठा समाजामध्ये काही लोकांना एक गुंठा ही जमीन नाही अशी बरीच लोकं महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यांमध्ये देखील आहेत काही वतनदार, सरकार ,जाहगीरदार सोडली तर ९० टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलीच पाहिजे हे आरक्षण नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे आहे असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.
ह्युमन राइट्सचे पन्हाळकर म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देणे अत्यंत  गरजेचे आहे सरकारने कायद्यात बदल करून आरक्षण द्यायला पाहीजे. तसेच या आरक्षण विरोधास डेमोक्राँटिक पार्टी आँफ इंडीया वडगांव शहर अध्यक्ष अजित टोमके ,व मानवअधिकार चे हमिद पन्हाळकर , काँग्रेस आयचे अनुसुचित जातीविभाग वडगांव शहर अध्यक्ष विकास कांबळे यांनी पाठींबा जाहीर केला , यावेळी सर्व धर्मीय जेष्ट नागरिक संघटना वडगांव शहर अध्यक्ष सुर्यकांत हजारे (काका) यांनीही पांठीबा दिला.   यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे ,जिल्हासंघटक संताजी भोसले , शहरअध्यक्ष धनाजी केर्लेकर , उपाध्यक्ष भारत पाटील , जेष्ट नागरीकचे सुर्यकांत हजारे , जयवंत सालकर , मानवआधिकार संवरक्षण कोल्हापूर जिल्हासचिव हमिद पन्हाळकर , डेमोक्राँटिकचे अजित ठोमके , काँग्रेस आयचे विकास कांबळे, सुनिल पाटील , सोमेश्वर मिरजे ,किरण यादव , अजित यादव , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसोलापुरातील वाळू उपसा लिलावाला अखेर परवानगी,वाळू सहज होणार उपलब्ध           
Next articleराज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here