Home कोल्हापूर युवा मराठा न्यूज चैनल एक आधारस्तंभ.: अजय थोरात.

युवा मराठा न्यूज चैनल एक आधारस्तंभ.: अजय थोरात.

50
0

आशाताई बच्छाव

1000303316.jpg

युवा मराठा न्यूज चैनल एक आधारस्तंभ.: अजय थोरात.

कोल्हापूर पेठवडगाव -राहुल शिंदे: युवा मराठा न्यूज चॅनल महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी बोलताना अजय थोरात म्हणाले युवा मराठा न्यूज चैनल महाराष्ट्र हे एक आगळा वेगळा उपक्रम पेठ वडगाव मध्ये राबवत असून त्याचे परिपूर्ण श्रेय युवा मराठा न्यूज चॅनलचे प्रमुख व मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत, कार्यकारी संपादक तथा कोल्हापूर ब्युरो चीफ राहुल शिंदे यांना देण्यात येत असून यापुढे देखील असे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन युवा मराठा न्यूज चॅनलने आपली परंपरा राखावी.युवा मराठा न्यूज चॅनेलनी नेहमीच परखड व निर्भीड बातम्या देऊन आपली सिद्धता सिद्ध केलेली आहे.
तसेच रंगराव बावडेकर म्हणाले की युवा मराठा न्यूज चैनल मराठा हे एक कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श न्यूज चैनल आहे.नेहमीच युवा मराठा न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध कार्यक्रम पाहत असतो.तसेच कार्यकारी संपादक राहुल शिंदे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात.यापुढे देखील असेच कार्यक्रम घेऊन समाजाला राहुल शिंदे यांनी दिशा दाखवावी.
यापुढे् प्राध्यापक अविनाश तेली म्हणाले की कार्यकारी संपादक राहुल शिंदे देता नेहमीच वडगाव मध्ये निर्भीड बातम्या देत असतात, युवा मराठा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बातम्या समजतात.यापुढे युवा मराठा न्यूज चॅनेलला काही मदत लागल्यास आम्ही नेहमीच तत्पर आहोत अशी गवाही प्राध्यापक अविनाश तेली यांनी दिली आहे.”तर आपल्या समारोप प्रसंगीच्या भाषणात युवा मराठाचे कोल्हापूर विभागीय कार्यकारी संपादक तथा ब्युरो चीफ राहुल शिंदे यांनी सांगितले की, युवा मराठा न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे प्रमुख व मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे.तर युवा मराठा न्यूज परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येऊन जनसामान्यांच्या कला गुणांना सन्मानित करण्यात येते.त्यामुळेच आज युवा मराठा न्यूज परीवार महाराष्ट्र फक्त बातम्या देण्यापुरताच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात एक जनसामान्यांची लोकचळवळ म्हणून उभा राहिला असल्याचे शेवटी शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here