Home परभणी कावी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कावी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

241

आशाताई बच्छाव

IMG-20221231-WA0047.jpg

कावी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

(परभणी)जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि.30 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे.
मयत तरुणाचे नावं बाळासाहेब भगवान शिंदे (वय ३०) असे आहे.मयत बाळासाहेब यांचे वडील हे कॅन्सर ग्रस्त आहेत त्यांना या गंभीर बिमारीची लागण होती बाळासाहेब यांना वडिलांचा दवाखान्याचा खर्च डोईजड होत असे प्रत्येक्ष दर्शींनी सांगितले असून दि.30 डिसेंबर रोजी मयत बाळासाहेब हे शेतात जागली वर गेला होता.त्याने स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सकाळी दिसून आला असून बामणी पोलिसांनी सकाळी पंचनामा करून मायताचे शवविच्छेदन करण्यासाठी जिंतूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जबाब नोंदविण्याची प्रकिया चालु असुन,पुढील तपास बिट जमादार मुरकुटे हे करीत आहेत.