Home नाशिक गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्या...

गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्या बड्या नेत्या वा अधिकाऱ्याचे पाठबळ..? ज्येष्ठ पत्रकार संपादक उपोषण दिवस तिसरा

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20230108-WA0006.jpg

गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्या बड्या नेत्या वा अधिकाऱ्याचे पाठबळ..? ज्येष्ठ पत्रकार संपादक उपोषण दिवस तिसरा

ठाणे : (अंकुश पवार, ठाणे ब्युरो चीफ, युवा मराठा न्युज)
६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. यादिवशी अशा दिवशीच युवा मराठा वेब चॅनलचे संपादक ,संस्थापक राजेंद्र राऊत पाटील यांना मालेगाव पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संपादक पत्रकार राजेंद्र राऊत पाटील यांच्यावर आमरण उपोषणाला बसण्याची हि दुसरी वेळ असून तर एकदा स्वतःच्या अंगार पेट्रोल ओतून जिवे मरण्याचा वाईट प्रसंग ओढवला होता या सर्व घटनेचे कारण मालेगाव पंचायत समितीचे गेंड्याच्या कातडीचे पांघरून घेऊन बुद्धी असून बुद्धी नसल्या सारखा कारभार करणारे प्रशासन हेच जबाबदार असून ह्या प्रशासनाच्या बे फीकिरीमुळे ,ढिसाळ नियोजन आणि बेजबाबदार पणाचा कळस गाठल्यामुळेच पत्रकार राजेंद्र राऊत यांना आमरण उपोषणाला बसावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील वऱ्हाणे गावातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागा पत्रकार भवन बांधण्या साठी रीतसर मागणी राऊत यांनी केली असून या जागेची अफरातफर करण्यात तत्कालीन ग्रामसेविका साळुंखे या जबाबदार असल्याचे आणि त्या दोषी असल्याचे चौकशी अहवाल खुद्द मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी यांनी चौकशी करून दोषी आढळल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे म्हणून सुद्धा आज पर्यंत दोषींवर कारवाई केली गेली नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्या बड्या नेत्या वा अधिकाऱ्याचे पाठबळ आहे काय ज्यामुळे हे तत्कालीन अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात आली नाही. आता मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,प्रधान सचिव, नाशिक कलेक्टर, पोलिस आयुक्त इत्यादी उच्च पातळीवर सादर उपोषणाची माहिती व पुरावे दिले आहेत. आता हे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना गैरव्यवहार प्रकरणी शासन सेवेतून निलंबित वरून सादर जागा मान्यतेनुसार पत्रकार भवनास मिळावी हे प्रमुख मागणी या उपोषणामागे आहे. हे दोन्हीही पर्याय मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार आहे. यावर युवा मराठा न्युज चॅनल अँड युवा मराठा महासंघ पदाधिकारी ठाम आहेत.

Previous articleकावी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleयुवा मराठा महासंघाच्या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची तारांबळ, मालेगाव कँम्पचे उपविभागीय पोलीस आधिकारी, डेप्यूटी SDPO यांची उपोषणस्थळी भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here