Home नाशिक युवा मराठा महासंघाच्या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची तारांबळ, मालेगाव कँम्पचे उपविभागीय पोलीस आधिकारी,...

युवा मराठा महासंघाच्या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची तारांबळ, मालेगाव कँम्पचे उपविभागीय पोलीस आधिकारी, डेप्यूटी SDPO यांची उपोषणस्थळी भेट

34
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230109-055730_YouTube.jpg

युवा मराठा महासंघाच्या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची तारांबळ, मालेगाव कँम्पचे उपविभागीय पोलीस आधिकारी, डेप्यूटी SDPO यांची उपोषणस्थळी भेट

ठाणे : (अंकुश पवार, ठाणे ब्युरो चीफ, युवा मराठा न्युज)
संपादक ,संस्थापक राजेंद्र राऊत पाटील यांना मालेगाव पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या बेफीकिरीमुळे ,ढिसाळ नियोजन आणि बेजबाबदार पणाचा कळस गाठल्यामुळेच पत्रकार राजेंद्र राऊत यांना आमरण उपोषणाला बसावे आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील वऱ्हाणे गावातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागा पत्रकार भवन बांधण्या साठी रीतसर मागणी राऊत यांनी केली असून या जागेची अफरातफर करण्यात तत्कालीन ग्रामसेविका साळुंखे या जबाबदार असल्याचे आणि त्या दोषी असल्याचे चौकशी अहवाल खुद्द मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी यांनी चौकशी करून दोषी आढळल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे म्हणून सुद्धा आज पर्यंत दोषींवर कारवाई केली गेली नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्या बड्या नेत्या वा अधिकाऱ्याचे पाठबळ आहे काय ज्यामुळे हे तत्कालीन अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात आली नाही. आता मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,प्रधान सचिव, नाशिक कलेक्टर, पोलिस आयुक्त इत्यादी उच्च पातळीवर सादर उपोषणाची माहिती व पुरावे दिले आहेत. या नंतर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राजेंद्र पाटिल राऊत यांच्या आमरण उपोषणाच्या ३र्या दिवशी रात्री ९. ४५ वाजता मालेगाव कँम्पचे उपविभागीय पोलीस आधिकारी डेप्यूटी SDPO मा, श्री प्रदिपकुमार जाधव साहेब कँम्प पोलिस स्टेशनचे पि एस आय मा.श्री राधाकृष्ण काळे साहेब व कँम्प पोलिस स्टेशनचे ८ पोलिस अंमलदार यांनी उपोषण स्थळी भेट देवुन विचारपुस करत सबंधितांनवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. परंतु केंद्रीय मंत्री यांचा आश्वासनाला देखील दाद न देणारे हे प्रशासन या पोलिस अधिकारी यांच्या आश्वासने तरी कारवाई करेल का? परंतु पूर्ण मागण्या मान्य झाल्या शिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी महासंघाची भूमिका आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here