Home गडचिरोली महा अंनिस तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त सेवनमुक्त राहण्यासाठी अनेकांनाचा शपथविधी संपन्न

महा अंनिस तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त सेवनमुक्त राहण्यासाठी अनेकांनाचा शपथविधी संपन्न

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0054.jpg

महा अंनिस तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त सेवनमुक्त राहण्यासाठी अनेकांनाचा शपथविधी संपन्न
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-
काल 31 मे तंबाखू विरोधी दिवस. तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचे गांभीर्य लक्षात घेऊन जगभरात व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना सावध करण्यासाठी जगभरात तंबाखू विरोधी दिवस मोठ्या प्रमाणात जिकडे तिकडे व खास करून प्रत्येक शासकीय कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. व पुन्हा ” ये रे माझ्या मागल्या” या म्हणीप्रमाणे पुढचा हाच दिवस येईपर्यंत आजच्या दिवशी शपथ घेतलेल्या पैकी किती जन जीवंत असतील, सांगता यायचे नाही. महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे दरवर्षी सकाळी रॅली काढून तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जे काही दुष्परिणाम होतात त्याच्या चित्रफीतीचे फलक सोबत घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्यात येते. महा अंनिस चे कार्यकर्ते आज कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले असल्याने व त्यांना गडचिरोली शहरात सदर कार्यक्रम घेता येणार नसल्याचे शल्य मनात होते पण कार्यक्रम घेण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नसल्यामुळे त्यांनी एस टी महामंडळ च्या कंडक्टर व ड्रायव्हर ला विनंती करून आपल्याला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी शपथ घ्यायची आहे असे विचारताच त्यांनी होकार दिला व सर्व प्रवाशासोबत नागभीड येथील एस टी स्टेशन वर सर्व प्रवाशांसोबत शपथविधी सोहळा संपन्न झाला. महा अंनिस चे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर यांनी शपथ दिली व त्यांचे मागून इरत प्रवाशांनी आनंदाने शपथ घेतली. महा अंनिस तर्फे राबविण्यात आलेल्या या कार्याचे प्रवाशांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे , प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री चोपराम कांबळे, चालक श्री संतोष येडामे, वाहक राजू पेटकर, विज्ञान बोध वाहिनी कार्यवाह उद्धव बांगरे, कु घोट शाखेचे महिला प्रतिनिधी सौ विजयाश्री कांबळे, कार्याध्यक्ष श्री आसिफ सय्यद , सदस्य सौ मुमताज सय्यद, गडचिरोली शहर शाखेचे कार्याध्यक्ष श्री उपेंद्र रोहनकर, प्रधान सचिव श्री हरिदास कोटरंगे , रजिया उसेंडी, व इतर प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here