Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते कोल्हापुर येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी रवाना .

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते कोल्हापुर येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी रवाना .

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0055.jpg

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते कोल्हापुर येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी रवाना .
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-
. २,३,४ जून रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला गडचिरोली येथील १६ कार्यकर्ते उपस्थित राहणार होते परंतु काही कारणास्तव एक कार्यकर्ता कमी झाल्याने आता एकुण १५ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ज्यात १० पुरुष व ५ महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे , प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री चोपराम कांबळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह श्री प्रशांत नैताम विज्ञान बोध वाहिनी कार्यवाह उद्धव बांगरे, घोट शाखेचे महिला प्रतिनिधी सौ विजयाश्री कांबळे, कार्याध्यक्ष श्री आसिफ सय्यद , सदस्य सौ मुमताज सय्यद, गडचिरोली शहर शाखेचे कार्याध्यक्ष श्री उपेंद्र रोहनकर, प्रधान सचिव श्री हरिदास कोटरंगे , महिला प्रतिनिधी श्रीमती अंजुम शेख, रजिया उसेंडी, सौ प्रमिला मारोती कुमरे व चामोर्शी शाखेचे प्रधान सचिव श्री शिवराम मोंगरकर आदी कोल्हापूर प्रवासासाठी गडचिरोली येथून नागपूर पर्यंत एस टी महामंडळ च्या बसने व नागपूर ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ने रवाना होत असून ते रेल्वेच्या निर्धारित वेळेनुसार उद्या दिनांक १ जून ला दुपारी ३ वाजेपर्यंत पोहोचतील. त्यांच्या या प्रवासाला गडचिरोली महा अंनिस चे जेष्ठ सल्लागार मा डॉ शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके, राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा देवाजी सोनटक्के, जिल्हा अध्यक्ष श्री रोहिदास राऊत, जिल्हा प्रधान सचिव प्रा श्री विलास पारखी, कोषाध्यक्ष श्री गोविंदराव ब्राम्हणवाडे, सुधाकर दुधबावरे, महिला प्रतिनिधी सौ सुधाताई चौधरी , लहुजी रामटेके, दामोधर ऊप्परवार आदींनी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला.

Previous articleमहा अंनिस तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त सेवनमुक्त राहण्यासाठी अनेकांनाचा शपथविधी संपन्न
Next articleव-हाणे प्रकरणात चौकशी समितीचा निव्वळ दिशाभूल करणारा फार्स-राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here