Home नांदेड चोरट्यांनी मोटारसायकल अडवत तलवारीचा धाक दाखवून पाच लाखांची रोकड पळवली ▪️ लोहा...

चोरट्यांनी मोटारसायकल अडवत तलवारीचा धाक दाखवून पाच लाखांची रोकड पळवली ▪️ लोहा शहरातील रात्री आठची घटना

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20240111-WA0046.jpg

▪️ चोरट्यांनी मोटारसायकल अडवत तलवारीचा धाक दाखवून पाच लाखांची रोकड पळवली
▪️ लोहा शहरातील रात्री आठची घटना

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार
लोहा शहरातील नांदेड रोड वरील पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली ४ लाख ९१ हजारची रोकड पेट्रोल पंप मालकाच्या घरी नेवून देण्यासाठी जात आसलेल्या पांपावरील कामगारास पाठलाग करून अडविले व त्याच्या जवळील रोकड तलवारीचा धाक दाखवून पळवल्याची घटना दि. ९ रोजी रात्री आठ वाजता चे दरम्यान घडली.
लोहा शहरातील नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीमाशंकर पेट्रोल पंप येथे दि. ९ रोजी मंगळवारी दिवसभराचा पेट्रोल, डिझेल विक्री व्यवसायातून जमा झालेली एकूण रक्कम ४ लाख ९१ हजार रुपयांची रोकड दैनंदिन प्रमाणे पेट्रोल पंप मालक यांच्या चौका लगत असलेल्या निवासस्थानी घेवून जात असताना दि. ९ रोजी रात्री आठ वाजताचे दरम्यान जुना लोह्यातील रहिवाशी नारायण नागरगोजे हे सदरील गोळा झालेली रोकड स्वतःच्या मोटारसायकल वरून पेट्रोल पंप मालक यांच्या घराकडे घेवून जात होते. नागरगोजे हे लोहा शहरातील शासकीय विश्रामगृहा जवळ येताच पाठीमागून तिघे जण बसलेली एक मोटारसायकल जवळ येवून त्यातील एकाने नागरगोजे यांच्या चालत्या मोटारसायकलीस लाथ मारली असता मोटारसायकल खाली पडली तसे चोरट्यांच्या मोटारसायकल वरील अज्ञात तिघे जण खाली उतरून त्याच्या पैकी एकाने (सर्व जण तोंडाला रुमाल लावलेले) तलवारीचा धाक दाखवत नारायण नागरगोजे यांच्या जवळील ४ लाख ९१ हजाराची रोकड हिसकावून घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पसार झाले. घटना घडताच बाजूस असलेले नागरिक धावले मात्र तलवार पाहून कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. सदर घटने प्रकरणी नारायण गोविंद नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश नाईक हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here